Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या (Imran Khan) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल देशभरात आंदोलन केले. सरकारने खान यांची तत्काळ मुक्तता करावी या मागणीसाठी जोरदार निदर्शने (Pakistan News) करण्यात आली. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी दडपशाहीचा वापर करत 500 कार्यकर्ते आणि समर्थकांना अटक केल्याची माहिती आहे. यातील बहुतांश लोकांना लाहोरमधून अटक करण्यात आली.
इमरान खान यांना दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. यानंतर लाहोर येथील त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या इमरान खान रावळपिंडी येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. खान यांच्या पक्षाने दावा केला आहे की इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी समर्थक आंदोलन करत आहेत. पार्टीचे एक वरिष्ठ नेते जुल्फी बुखारी यांनी सांगितले, की 5 ऑगस्टला इमरान खान यांना अटक होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. कायदेशीर टीम आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील जास्त वेळ त्यांना भेटू दिले जात नाही.
खळबळजनक! आपल्याला आयोध्येतील राम मंदिर उडवायचय; बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून सुपारी
सध्याच्या सरकारने सभा घेण्यावरही बंदी घातली आहे. मुख्य मार्ग अवरुद्ध केले आहेत. इतकेच नाही तर पक्षाचा झेंडा असणाऱ्या वाहनांची तोडफोड केली आहे. पक्षातील सक्रिय नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरावर छापेमारी केली जात आहे. एकट्या पंजाब प्रांतातून आतापर्यंत 500 पेक्षा जास्त नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या लोकांत खासदारांचाही समावेश आहे असे बुखारी यांनी सांगितले.
पाकिस्तानात लोकशाही राहिलेली नाही. येथे कायद्याचं राज्य नाही तसेचये येथील नागरिकांकडे कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. आंदोलक दिवसभर शांततेत आंदोलन करतील. सत्तेत असूनही सरकार कमकुवत दिसू लागली आहे असेही बुखारी यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना पंजाब प्रांतात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे लोकांना एकत्र येण्यावर बंदी आहे. इमरान खान यांच्या पक्षाच्या रॅलींच्या मीडिया कवरेजवरही बंदी आहे. परंतु, या रॅलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
दहशतवादाचे मूळ पाकिस्तान अन् ही काँग्रेसची चूक, अमित शहांचा हल्लाबोल