Pakistan News : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव (Pakistan News) वाढलेला आहे. यातच आता पाकिस्तानला हादरवणारी बातमी आहे. पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी अतिरेक्यांनी स्कूल बसला टार्गेट केलं आहे. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार एक आत्मघाती कार बॉम्ब हल्लेखोराने एक स्कूलबसला टार्गेट केलं. हा हल्ला बलुचिस्तान (Baluchistan) प्रांतात झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानातील हा सर्वात अशांत प्रांत आहे. या ठिकाणी बलूच बंडखोर सातत्याने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची मागणी या बंडखोरांकडून होत आहे.
पाकिस्तानातील न्यूज वेबसाइट डॉननुसार स्कूलबस झिरो पॉइंटजवळ होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थी आणि अन्य लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना क्वेटा आणि कराची येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. हल्ला कुणी केला यानंतरच यातील आणखी माहिती समोर येईल.
Suicide car bomb hits school bus in restive southwestern Pakistan, kills 4 children and wounds 38, AP reports quoting officials
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2025
ब्रेकिंग : सामान्यांच्या घरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर
लहान मुलांना टार्गेट करून त्यांना मारणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. यानंतर पाकिस्तानी गृहमंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठ्या षडयंत्राचा भाग आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानातील बलुचिस्तानात अनेक वर्षांपासून तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानपासून वेगळे होऊन स्वतंत्र देशाची मागणी बलूच बंडखोरांची आहे. येथील जनतेचाही त्यास पाठिंबा आहे. त्यामुळे या भागात सातत्याने पाकिस्तानविरोधी आंदोलने होत असतात. आंदोलने दडपून टाकण्यासाठी पाकिस्तानी सैन्य येथील नागरिकांवर अनन्वित अत्याचार करत असते. त्यामुळेच पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी सैन्याबाबत बलूच लोकांत प्रचंड राग आहे. त्यामुळेच येथे पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने हल्ले होत असतात.
पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा बनला आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सैन्य अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम करत आहेत. पाकिस्तानच्याच दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये नरसंहार घडवून आणला. त्यांना काश्मिरातील काही स्थानिकांनीही मदत केल्याचे आता समोर आले आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता तर पाकिस्तानातच दहशतवादी हल्ले होऊ लागले आहेत.
होय, मी पाकिस्तानला माहिती पुरवली; ज्योती अन् गजालाने आपले पत्ते उघडले