Download App

Terrorist : पाकिस्तानमध्ये जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या साथीदाराची हत्या; दहशतवादी दाऊद मलिक ठार

Terrorist : पाकिस्तानातील (Pakistan)उत्तर वझिरिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मलिक दाऊद (Malik Dawood)नावाच्या एका दहशतवाद्याची (terrorist)हत्या करण्यात आली. तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचा(Masood Azhar) राईट हॅन्ड असल्याचे मानले जात आहे.

रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला

भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे.नुकतीच या यादीत दोन नवीन नावं जोडली. त्यापैकी एक शाहिद लतीफ होता, तो पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ आहे, याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनीच गोळी घालून ठार केले.

Rohit Pawar : ‘फडणवीस अभ्यासू पण, जास्त खोटं बोलतात’; कंत्राटी भरतीवरून रोहित पवारांचा खोचक टोला

पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मलिक दाऊदची पाकिस्तानातील आदिवासी जिल्हा असलेल्या उत्तर वझिरीस्तानमधील मिराली भागात अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मलिक दाऊदला टार्गेट करुन त्याचा पाठलाग केला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दाऊद मलिक हा जैश-ए-मोहम्मद व्यतिरिक्त लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जंगवीशीही संबंधित होता. मसूद अझहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम आदिंना भारत सरकारने UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे.

पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमध्ये दाऊद मलिक मारला गेला आहे. ते अज्ञात लोकांच्या गोळ्यांचे लक्ष्य बनले. सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी पाकिस्तानमध्ये असलेले भारताचे अनेक मोस्ट वाँटेड दहशतवादी मारले गेले आहेत. इतकंच नाही तर भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना विचित्र पद्धतीने लक्ष्य करण्याची प्रक्रिया पाकिस्तानातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही सुरु झाली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बालाकोटवर हवाई हल्ला केला. त्यावेळी दाऊद मलिक तेथे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्या हल्ल्यानंतर दाऊद मलिक फरार झाल्याची माहिती समोर आली. हे सर्व दहशतवादी आयएसआयच्या संरक्षणाखाली राहतात. जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाकिस्तान या दहशतवाद्यांसाठी नवनवीन डावपेच आखतो. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने मौलाना मसूद अझहर अफगाणिस्तानमध्ये असल्याचे सांगितले होते. त्याच्या अटकेसाठी अफगाणिस्तानला पत्र लिहिले आहे.

परदेशात काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दोन मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवाद्यांना ‘120’ तासांत ठार मारणे ही मोठी घटना होती. पहिला खलिस्तानी दहशतवादी अवतार सिंग खंडा मारला गेला. 15 जूनला बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात त्याचे निधन झाले. त्यानं लंडनमधील भारतीय दूतावासाचा राष्ट्रध्वज खाली करुन अपमान केला होता. त्यानंतर 19 जूनला कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडात मृत्यू झाला. दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांना मारले.

या दोन्ही दहशतवाद्यांचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यादीत समावेश होता. एनआयएने हरदीप सिंह निज्जरवर 10 लाखांचे बक्षीस ठेवले होते. अवघ्या 120 तासांत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर कॅनडा आणि इतर देशांमध्ये बसलेल्या खलिस्तानी समर्थकांचे धाबे दणाणले आहेत.

follow us

वेब स्टोरीज