पाकिस्तान देणार इस्त्रायलला मान्यता; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी अट काय?

Donald Trump On Abraham Accord : अमेरिका आणि इराण दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या संघर्ष विरामसाठी चर्चा सुरू असून

Donald Trump On Abraham Accord

Donald Trump On Abraham Accord

Donald Trump On Abraham Accord : अमेरिका आणि इराण दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या संघर्ष विरामसाठी चर्चा सुरू असून पाकिस्तान या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर दुसरीकडे मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन अट घातल्याने पाकिस्तान अडचणीत सापडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची अशी इच्छा आहे की, इराणच्या मुस्लिम मित्रराष्ट्रांनी अब्राहम करारांवर स्वाक्षरी करावी आणि इस्त्रायलला एक राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी. ट्रम्प यांच्या या अटीमुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पाकिस्तानला मोठा धक्का?

इराण आणि अमेरिकेत संघर्ष विराम चर्चेसाठी पाकिस्तानने (Pakistan) आतापर्यंत मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे मात्र ट्रम्प (Donald Trump) यांनी घातलेल्या या अटीनंतर पाकिस्तान काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या या प्रस्तावावर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ (Khwaja Asif) यांनी प्रतिक्रिया देत हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आपल्या मूलभूत तत्वांच्या आणि आदर्शांच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही करारात आपण सहभागी होऊ नये असं माझे मत आहे. पाकिस्तानने इस्त्रायलसोबत (Israel) कोणत्याही प्रकारचे व्यासपीठ सामयिक करावे ही कल्पनाच या राष्ट्रासाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं त्यांनी म्हटले आहे.

 

CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ; 15 दिवसात चौथ्यांदा वाढले दर-

 ‘अब्राहम करार’ म्हणजे काय?’

अब्राहम करारां’ची सुरुवात 2020 मध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने करण्यात आली होती. या करारांचे मुख्य उद्दिष्ट अरब राष्ट्रे आणि इस्रायल यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याद्वारे दशकांपासून चालत आलेले वैमनस्य संपुष्टात आणणे तसेच मध्यपूर्वेमध्ये इराणचा वाढता प्रभाव रोखणे हे आहे.

शेतकऱ्यांना दिलासा; आजपासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी

Exit mobile version