व्हाईट हाऊस’च्या सुरक्षा भिंतीजवळ गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया काय?
व्हाईट हाऊसच्या वेशीजवळ सीक्रेट सर्विस एजंट्ससोबत झालेल्या गोळीबाराच्या चकमकीनंतर तो बंदूकधारी ठार झाला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान (America) असलेल्या ‘व्हाईट हाऊस’च्या सुरक्षा भिंतीजवळ शनिवारी सायंकाळी ६.३० नंतर एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेने आणि स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांनी अत्यंत जलद कामगिरी केली. चकमकीत हा संशयित जागीच ठार झाला. दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
हिंसक पार्श्वभूमी असलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या व्हाईट हाऊस इमारतीबद्दल अवाजवी आकर्षण असलेल्या बंदूकधाऱ्याविरुद्ध आज संध्याकाळी तातडीने आणि व्यावसायिक पद्धतीने केलेल्या कारवाईबद्दल आमच्या महान सीक्रेट सर्विस (गुप्तहेर यंत्रणा) आणि कायदा अंमलबजावणी संस्थांचे मनापासून आभार, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “व्हाईट हाऊसच्या वेशीजवळ सीक्रेट सर्विस एजंट्ससोबत झालेल्या गोळीबाराच्या चकमकीनंतर तो बंदूकधारी ठार झाला आहे. ही घटना ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर’ मधील गोळीबाराच्या घटनेनंतर बरोबर एका महिन्याने घडली आहे, आणि यावरून हे सिद्ध होते की, भविष्यातील सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये आजवरची सर्वात सुरक्षित आणि अभेद्य जागा निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा याची मागणी करते!”
२४ मे रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार), सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना बेस्ट १७ व्या स्ट्रीट नॉर्थवेस्ट येथे विचित्र वर्तन करताना दिसला. त्याने बंदूक काढून काही फेऱ्या झाडल्या, यामुळे एक पादचारी गंभीर जखमी झाला. मात्र, सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत या माथेफिरू बंदूकधाऱ्याला तात्काळ रोखले. यात बेस्ट जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
“Thank you to our great Secret Service and Law Enforcement for the swift and professional action taken this evening against a gunman near the White House…” – President Donald J. Trump pic.twitter.com/PCfmZgSC1w
— The White House (@WhiteHouse) May 24, 2026