Download App

Pahalgam Attack : आम्ही हे घाणेरडं काम…; दहशतवादाबद्दल पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची निर्लज्जपणे कबुली

Pakistani Defence Minister admits about terrorism : पहलगाम हल्ल्यावरून ( Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानवर निशाणा साधलाय. त्यांच्याविरोधात कठोर निर्णय देखील भारत सरकारने घेतलेले आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक खळबळजनक विधान समोर आलंय. दहशतवादाबद्दल (terrorism) पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी निर्लज्जपणे कबुली दिली (India Pakistan War) आहे. ते नेमकं काय म्हटले, आपण सविस्तरपणे जाणून घेऊ या.

पहलगाममध्ये (Pakistan) दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी 26 जणांची हत्या केली. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतोय. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका निवेदनात कबूल केलंय की, पाकिस्तान गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाला पोसत आहे. ते ब्रिटिश मीडियाशी बोलत होते. यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की, पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा जुना इतिहास आहे, हे तुम्ही मान्य करता का? यावर आसिफ ख्वाजा यांनी खळबळजनक कबुली दिली आहे. त्यांनी (Pakistani Defence Minister)उत्तरात म्हटलंय की, हो…आम्ही गेल्या तीन दशकांपासून अमेरिका आणि ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी हे घाणेरडे काम करत आहोत.

पहलगामनंतर भारतीय सैन्याचा ‘प्रहार’; लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

त्यांच्या विधानामुळे भारताची भूमिका बळकट झालीय. भारताने सातत्याने म्हटलंय की पाकिस्तान सरकार दहशतवादाला पाठिंबा देते. पण पाकिस्तानने अमेरिकेला त्यांच्या दहशतवाद धोरणासाठी जबाबदार धरलंय. ते म्हणाले, ‘आम्ही अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी तीन दशके दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला, कारण तो रणनीतीचा भाग होता. यासाठी पाकिस्तानला दोष देणे चुकीचं आहे, कारण ते पाश्चात्य देशांच्या सूचनांनुसार काम करत आहे, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय.

अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्स घेत असत, ज्यामुळे पाकिस्तानी राजकारणी आणि सेनापतींनी खूप पैसा कमावला आहे. पाकिस्तानी नागरिक देखील ख्वाजा आसिफ यांच्या विधानावर खूश नाहीत. x वरील एका वापरकर्त्याने लिहिलंय की, ‘हा जोकर ख्वाजा आसिफ आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भारताच्या वतीने उपस्थित राहून कबूल करतो की, ‘आम्ही 30 वर्षांपासून घाणेरडे काम केलंय’. ते भारताची बाजू घेत आहेत की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री बनून पाकिस्तानचे रक्षण करण्यासाठी आले आहेत? यावेळी पाकिस्तानसाठी हे किती लज्जास्पद विधान आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय.

‘आम्हाला वेगळं करू नका…न्याय हवा’; पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री हिना खानची पोस्ट

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा लष्करचा प्रमुख आहे. तो अजूनही पाकिस्तानात राहत आहे. पण ख्वाजा आसिफ यांनी निर्लज्जपणे सांगितलं की, लष्कर पाकिस्तानात नाही. त्यांनी दावा केला की, द रेझिस्टन्स फ्रंट ही अशी संघटना आहे, ज्याबद्दल कधीही ऐकले गेले नाही. हे खोटे असल्याचं देखील पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलंय.

 

follow us