‘कुणाल कामराला अटक करू नका’; मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

‘कुणाल कामराला अटक करू नका’; मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

Bombay High Court Order Dont Arrest Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘देशद्रोही’ म्हणल्याप्रकरणी स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) मोठा दिलासा मिळालाय. कुणाल कामराला अटक करू नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटलंय. काल याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ‘देशद्रोही’ वक्तव्य केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण (Kunal Kamra Case) दिलं. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठाने सध्या तपासाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. पण जर पोलिसांना कामराची चौकशी करायची असेल, तर त्यांना चौकशी चेन्नईमध्ये करावे लागेल कारण कामरा तामिळनाडूचा रहिवासी आहे. कामराच्या एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आलेत.

‘आम्हाला वेगळं करू नका…न्याय हवा’; पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री हिना खानची पोस्ट

कामराची सध्याची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असताना जर मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले, तर कनिष्ठ न्यायालय कामरावर कोणतीही कारवाई करणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाने यापूर्वी 16 एप्रिल रोजी कामरा यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला होता, जो आता कायम ठेवण्यात आला आहे.

“मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की..” पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रणावरून ट्रोल झाल्यानंतर नीरजचं वक्तव्य

कुणाल कामराचे प्रकरण काय ?
मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये एका कार्यक्रमादरम्यान कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. यानंतर शिवसैनिकांनी हॉटेल-स्टुडिओची तोडफोड केली होती. पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या विरोधात कामरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तोडफोड प्रकरणात अटक केलेल्या 12 शिवसैनिकांना न्यायालयाने त्याच दिवशी सोडले. कामराने माफी मागण्यास नकार दिला होता.

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश थोडक्यात

कुणाल कामराला अटक करू नये
मुंबई पोलीस एफआयआरमध्ये चौकशी सुरू ठेवू शकतात
कामराची चौकशी चेन्नईमध्ये करावी लागेल
जर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले तर हायकोर्ट कामराच्या याचिकेवर निर्णय देईपर्यंत ट्रायल कोर्टाने कारवाई करू नये.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube