मोठी बातमी! कुणाल कामराला दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाने दिली अटकेला स्थगिती

मोठी बातमी! कुणाल कामराला दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाने दिली अटकेला स्थगिती

Kunal Kamra Case : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कुणाल कामराच्या (Kunal Kamra) याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राखून ठेवून त्याच्या अटकेला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की कामरा यांना भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती, जी अटकेसाठी नाही तर जबाब नोंदवण्यासाठी आहे. न्यायालयाने म्हटले की कामरा यांचे जबाब नोंदवता येतात परंतु तरतुदीनुसार अटक करता येत नाही.

कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात एका कार्यक्रमात गांण म्हटल्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले होते. कुणाल कामरा याच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर या प्रकरणात चौकशीसाठी खार पोलिसांनी कुणाल कामरा याला तीनदा समन्स देखील पाठवले होते मात्र कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नव्हता.

आज 16 एप्रिल, पैसे आले का? उद्धव ठाकरेंचा कृषिमंत्री कोकटेंवर हल्लाबोल

तर दुसरीकडे या प्रकरणात त्याने मुंबई उच्चा न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यावर आता मुंबई उच्चा न्यायालयाने निर्णय राखून ठेवत कुणाल कामर याच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

… तर दलित सरसंघचालक करुन दाखवावा, निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा ओपन चॅलेंज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube