… तर दलित सरसंघचालक करुन दाखवावा, निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा ओपन चॅलेंज

… तर दलित सरसंघचालक करुन दाखवावा, निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray On RSS :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करुन दाखवावा अशी टीका केली होती तर त्याला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपाळकर यांनी आरएसएसने (RSS) दलित सरसंघचाक करुन दाखवावा असा आव्हान पंतप्रधान मोदींना (PM Modi) दिला होता तर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाशिक (Nashik) येथील निर्धार मेळाव्यात (Nirdhar Mela) बोलताना भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल करत संघाने दलित सरसंघचालक करुन दाखवावा असं म्हणत ओपन चॅलेजं दिले आहे.

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरु केली असून यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करुन दाखवावा, तुम्ही आणि काँग्रेस बघून घ्या. पण मला एक दोन गोष्टी आवडले.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपाळकर  म्हणाले असं जर असेल तर संघाने दलित सरसंचालक करुन दाखवावा. येत्या वर्षात संघाला 100 वर्षपूर्ण होणार आहे आणि काँग्रेसला देखील सव्वाशे – दिडशे वर्ष झाले आहे. या काळात संघाने किती दलितांना सरसंचालक केले आणि काँग्रेसने किती  मुस्लिमांना अध्यक्ष केले याचा हिशोब जनतेसमोर मांडावे असं या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच भाजपने आम्हाला तुमचा हिंदुत्व काय आहे? हे सांगावे अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

स्पष्ट सांगा, मुस्लिमांना हिंदू संस्थांमध्ये संधी मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा

तर दुसरीकडे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे म्हणाले की, अमित शाहजी जर तुम्हाला खरोखर शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा. फक्त मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करु नका अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube