आज 16 एप्रिल, पैसे आले का? उद्धव ठाकरेंचा कृषिमंत्री कोकटेंवर हल्लाबोल

आज 16 एप्रिल, पैसे आले का? उद्धव ठाकरेंचा कृषिमंत्री कोकटेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray On Manikrao Kokate: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिक येथे आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात काही वचनं दिली होती. थापा मारल्या होत्या. शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ कर, माताभगिनींना आम्ही 2100 रुपये देऊ असे सांगितले होते मात्र किती महिलांच्या खात्यात पैसे आले. त्यांनी दणादण घोषणा केल्या पण आता सांगत आहे फक्त 500 रुपये मिळतील मग माताभगिनींना फसवून मते का घेतली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करत ठाकरे म्हणाले की, माझ्या शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केली. कोकाटे अगोदर बोंबलत होते की, 31  मार्चपर्यंत मनो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील पण पैसे आले का? आज तारीख 16 एप्रिल आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले का? असा सवाल त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांची चेष्ठा चालू आहे. कोकाटे म्हणाले कर्जमाफी कशाला पाहिजे, लग्न कराला का? पण त्यांच्या बापाचे काय जात आहे. आम्ही कर्ज काढतोय, शेती करतोय, तुम्हाला काय करायचे आहे. शेतकरी आत्महत्या करतो, त्या घरात कधी मंत्री जातो का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

स्पष्ट सांगा, मुस्लिमांना हिंदू संस्थांमध्ये संधी मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा

तर दुसरीकडे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे म्हणाले की, अमित शाहजी जर तुम्हाला खरोखर शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा. फक्त मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करु नका अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube