Download App

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला, कोण आहेत सवीरा प्रकाश?

Savira Prakash : पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका (Pakistani elections) होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद निवडणूक लढवत असल्याच्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे सवीरा प्रकाश (Savira Prakash) या हिंदू महिलेनेही खैबर पख्तूनख्वामधील बुनेरमधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानात निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला आहेत. 16व्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य निवडण्यासाठी पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या मैदानात हिंदू महिला
सवीरा प्रकाश पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. बुनेर जिल्ह्यातील PK-25 च्या सर्वसाधारण जागेसाठी त्यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला आहे. सवीरा प्रकाश निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीचं सक्रीय होत्या. त्यांचे वडील पीपीपीचे जुने कार्यकर्ते आहेत.

कौमी वतन पार्टीशी संबंधित स्थानिक नेते सलीम खान यांनी पाकिस्तानस्थित वृत्तपत्र द डॉनशी बोलताना सांगितले की, बुनेरा येथून सर्वसाधारण जागेवर आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणारी सविरा ही पहिली महिला आहे.

Mumbai : RBI सह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवलेत; धमकी देत सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी

कोण आहेत सवीरा प्रकाश?
सवीरा प्रकाश यांनी 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. बुनेरमधील पीपीपी महिला विंगच्या महासचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. महिलांच्या हक्कांसाठी त्या कार्यरत आहेत तसेच अनेक चळवळींशी जोडलेल्या आहेत.

फ्रान्सवरुन 276 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत दाखल; पण 27 प्रवासी तिथेच का थांबले?

त्या निवडून आल्यास विशेषत: परिसरातील महिलांसाठी असे काम करणार आहेत की त्यामुळे त्याचा खडतर प्रवास संपून पुढे जाता येईल. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवीरा म्हणाल्या की, मानवतेची सेवा करणे हे त्यांच्या रक्तात आहे आणि त्यांनी सरकारी रुग्णालयातील ढिसाळ कारभार जवळून पाहिला आहे. ती परिस्थिती सुधारण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहे.

Tags

follow us