Download App

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त

Pakistan Interim PM: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची औपचारिक शिफारस करणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत आहे. एआयवाय न्यूज, डेली पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, शेहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर जलील अब्बास जिलानी काळजीवाहू पंतप्रधान होऊ शकतात.

जलील अब्बास जिलानी हे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांनी अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये राजदूत, ऑस्ट्रेलियातील पाकिस्तानचे उच्चायुक्त आणि भारतातील पाकिस्तानचे उपउच्चायुक्त म्हणून काम केले आहे.

World Cup 2023 Scheduled : भारत-पाकसह 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या; पहा नवे शेड्युल

अंतरिम सरकार पाकिस्तानात सत्ता हाती घेईल
नॅशनल असेंब्ली बरखास्त झाल्याने पाकिस्तानमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी बुधवारी राष्ट्रपतींना पत्र लिहून नॅशनल असेंब्ली विसर्जित करून शिफारस करणार असल्याचे शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी सांगितले होते. यानंतर अंतरिम सरकार येणार आहे.

संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली

2022 मध्ये पंतप्रधान झाले
पंतप्रधान शरीफ यांनीही मंगळवारी जनरल हेडक्वार्टरला (जीएचक्यू) निरोप दिला होता. 10 एप्रिल 2022 रोजी पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटादरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावानंतर विरोधी पक्षांच्या वतीने शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल 2022 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

Tags

follow us