Bangladesh train accident : बांग्लादेशमध्ये आज पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भैरब रेल्वे स्थानकाचे अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, चट्टोग्रामकडे जाणारी मालगाडी किशोरगंज येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता ढाक्याकडे येणाऱ्या आगरो सिंदूर एक्सप्रेसला धडकली.
बांग्लादेश अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण मीडिया प्रमुख शाहजहान सिकदर यांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक तुकड्या बचावकार्य करत आहेत. ढाका रेल्वे पोलीस अधीक्षक अन्वर हुसैन यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार मालगाडीने एगारो सिंदूर एक्सप्रेसला मागून धडक दिली.
बिशनसिंह बेदी यांनी भारतीय क्रिकेटला नेमकं काय दिलं?
काय प्रकरण आहे?
ढाक्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये हा अपघात झाला. राजधानी ढाकाजवळील किशोरगंज येथे झालेल्या या अपघातात डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या धडकेत इतर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही संख्याही वाढू शकते.
इतर भागांतील रेल्वे सेवा स्थगित
या दुर्घटनेनंतर देशाच्या इतर भागात जाणारी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजूनही अनेक लोक रेल्वेखाली अडकले आहेत.
वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम
मृतांचा आकडा वाढू शकतो
भैरबचे अधिकारी सादिकुर रहमान यांनी सांगितले की, आम्ही 15 मृतदेह बाहेर काढले आहेत, अनेक जखमी अजूनही अडकले आहेत. ते म्हणाले की मृतांचा आकडा वाढू शकतो कारण मृतदेह अजूनही चिरडलेले आणि उलटलेल्या डब्याखाली अडकलेले दिसतात. ते म्हणाले की, किमान 100 लोक जखमी झाले आहेत.
अनेक जखमी डब्याखाली दबले गेले
अनेक जखमी डब्याखाली दबले गेल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.