वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम

वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम

Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले
पराग देसाई हे गेल्या आठवड्यात (15 ऑक्टोबर) मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, तेव्हा अचानक त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला आणि कुत्र्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना ते जमिनीवर पडले. कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या शेल्बी रुग्णालयात नेण्यात आले. एक दिवसाच्या निरीक्षणानंतर, त्यांना शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान केले.

‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं

एएनआयनुसार शेल्बी हॉस्पिटल्सने एका प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की पराग देसाई यांना संध्याकाळी 6 च्या सुमारास आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. ते बेशुद्ध होते आणि उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर पराग देसाई खाली पडले असे सांगण्यात आले परंतु त्यांच्या शरीरावर कुत्र्याच्या चाव्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. सीटी स्कॅनमध्ये फ्रंटल कॉन्ट्युशनसह तीव्र सबड्यूरल हेमेटोमा दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांत कुत्रा चावल्यामुळे किंवा भटक्या प्राण्यांमुळे झालेल्या अपघातांचे बरेच प्रकरणे समोर येत आहेत.

International Film Festival: 54 व्या इफ्फीमध्ये 25 फीचर अन् 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवले जाणार

कंपनीची उलाढाल 2000 कोटी
सात दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर देसाई यांचे 22 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 9 वाजता थलतेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पराग देसाई हे वाघ बकरी चहा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश देसाई यांचे पुत्र होते. 30 वर्षांहून अधिक काळ उद्योजकतेसह देसाई यांनी कंपनीची उद्योजकता, विक्री, विपणन आणि निर्यात विभाग सांभाळला आहे. कंपनीची उलाढाल 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube