‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं

‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं

Vijay Wadettivar Speak on Maratha Reservation : जाहिरातबाजी करुन सरकारने मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून EWS मधून किती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, यासंदर्भात माहिती दिली. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जातनिहाय जनगणनेची अजितदादांची मागणी रास्त पण…; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नावर राज्य सरकारने चालवलेली जाहिरातबाजी म्हणजे मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. मनोज जरांगे पाटील हा एकच माणूस सरकारची फजिती करत असल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्र बघत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Happy Birthday Prabhas: अभिनेता प्रभासला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर …

तसेच सरकारने मराठ्यांचे कुठलेही प्रश्न न सोडवता केवळ जाहिरातबाजी करणे म्हणजे हे सरकार मनोरंजन करीत असल्याची टीकाही विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केली आहे.

IND vs NZ : भारतासमोर 274 धावांचे आव्हान: मोहम्मद शमीने संधीचे केले सोने

काल सरकारकडून वृत्तपत्रांमधून मराठा समाजासाठी EWS अंतर्गत अनेक योजना राबवण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरातीमधून “शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या सधीचं सोन करा” , “आम्ही पाया मजबूत बनवला आहे सकारात्मक ध्येयाकेड वाटचाल करा” असं आवाहन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.

Gavran Meva : प्रतिक्षा संपली ! ‘गावरान मेवा’ घेऊन गणप्या अन् सुगंधा आले प्रेक्षकांच्या भेटीला

EWS अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश, तसेच एमपीएससीमार्फत सरकारी सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती केल्याचे या जाहिरातीत म्हटलं आहे.

कायमचा उपचार करा, मलमपट्टी नको; जरांगे
आमरण उपोषणानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे यांनी सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला असून सरकारने EWSचं नवीन पिल्लू आणलं, पण EWS हे सर्वांसाठी आहे, आमच्या भावनांशी खेळू नका, आम्हाला बहाणे सांगू नका. आरक्षणाबाबत आम्हाला कायमचा उपचार करा, तात्पुरती मलमपट्टी नको,” असे जरांगे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube