बिशनसिंह बेदी यांनी भारतीय क्रिकेटला नेमकं काय दिलं?

बिशनसिंह बेदी यांनी भारतीय क्रिकेटला नेमकं काय दिलं?

Bishan Singh Bedi: भारतीय क्रिकेट टीमचे (Indian Cricket Team)माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू (spinner)बिशनसिंह बेदी (Bishan Singh Bedi)यांचं आज सोमवारी (दि.23) निधन झालं. त्यांच्या निधनामुळं अवघ्या क्रिकेट विश्वावर (Cricket world)शोककळा पसरली. बेदी यांनी 1967 ते 1979 दरम्यान भारतासाठी 67 कसोटी क्रिकेटमध्ये 266 विकेट घेतल्या. ते मागील दोन वर्षांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. भारताच्या पहिल्या वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup)विजयामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Pune Metro : स्वप्न पूर्ण होणार! मेट्रो ट्रेन पिंपरीपासून आता थेट निगडीपर्यंत, केंद्राची मंजुरी

बिशनसिंह हे त्यांच्या काळातले दिग्गज स्पिनरपैकी एक होते. बिशनसिंह यांनी टीम इंडियाचं काही काळ नेतृत्वदेखील केलं आहे. त्यावेळी नव्यानेच सुरु झालेल्या वनडे क्रिकेटमध्ये त्यां च्या नावावर सात विकेट्स आहेत. बिशनसिंह बेदी यांनी 14 वेळा 5 विकेट घेतल्या तर एकदा 10 विकेट घेण्याचा कारनामा केला.

‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं

बिशन सिंह बेदी यांचा जन्म 1946 मध्ये अमृतसरमध्ये झाला. असं असलं तरी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते दिल्लीकडून खेळले. बेदी यांनी 370 सामन्यांत 1560 विकेट घेतल्या आहेत. बेदी यांनी 1978-79 आणि 1979-80 मध्ये दिल्लीकडून खेळत असताना सलग दोन रणजी विजेतेपद पटकावलं. त्याचबरोबर त्यांच्या काळात दिल्ली संघ दोनवेळा उपविजेता देखील राहिला. त्यांच्या कॅप्टनशीपच्या काळात दिल्ली संघानं पाच वर्षामध्ये चार फायनलच्या मॅचदेखील खेळल्या.

बिशनसिंह यांनी 31 डिसेंबर 1966 या दिवशी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर देशासाठी पहिला सामना खेळला. बेदी यांनी पहिली टेस्ट मॅच वेस्ट इंडिज संघाच्या विरोधात खेळली. तर 1974 मध्ये त्यांनी इंग्लंडविरोधात आपली वनडेची सुरुवात केली. बिशनसिंह यांनी 22 टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं. त्यात टीम इंडियानं 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 11 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला. तसेच पाच सामने ड्रॉ झाले. तसेच त्यांनी चार वनडे सामन्यांमध्ये कॅप्टनशिप केली. त्यातील एका सामन्यात विजय मिळवला, तर तीन सामन्यांमध्ये हार स्विकारावी लागली.

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज बिशनसिंह हा एकाच बॉलिंग अॅक्शनने चार प्रकारचे बॉल टाकायचा. जगातील सर्वोत्तम स्पिनर मानला जाणारा शेन वॉर्नही त्याला आपला आदर्श मानायचा. बेदी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या गोलंदाजीची ताकद ही त्यांच्या बोटांमध्ये होती. हाताची बोटं बळकट करण्यासाठी आणि मनगट लवचिक बनवण्यासाठी ते स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. त्यामुळे त्यांच्या बोटांना बळ मिळालं आणि बॉल बोटांमध्ये धरुन फिरवणं सोप्पं झालं व्हायचं.

बिशनसिंह यांचं दोनवेळा लग्न झालं होतं. त्यांची पहिली पत्नी ऑस्ट्रेलियन होती. भारतीय क्रिकेट संघ 1967-68 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी मेलबर्नमधील एका पार्टीमध्ये बिशनसिंह यांची भेट ऑस्ट्रेलियन तरुणी ग्लेनिथशी झाली. पुढे त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर त्यांनी लग्न देखील केलं. काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. बिशनसिंह यांनी पुढे अंजू यांच्याशी लग्न केलं. त्या दोघांना अंगद बेदी नावाचा मुलगा आहे. तो एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube