Mexico Plane Crash : मेक्सिकोमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान एक मोठा विमान अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका खाजगी जेट इमर्जन्सी लँडिंगदरम्यान एक इमारतीवर आदळल्याने अपघात झाला आहे. इमारतीवर आदळताच जेटचे आगीमुळे तुकडे झाले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला तर 130 जणांना वाचवण्यात आले आहे. खाजगी जेटमध्ये आठ प्रवासी आणि दोन क्रू सदस्य असल्याची माहिती मेक्सिको राज्य नागरी संरक्षण समन्वयक एड्रियन हर्नांडेझ यांनी दिली.
🚨BREAKING: PASSENGER PLANE CRASHES INTO A WAREHOUSE IN MEXICO⚡️
A Cessna Citation III Reg XA-PRO flying from Acapulco to Toluca Airport(TLC) in Toluca, Mexico crashes in San Pedro Totoltepec with a big explosion.
All 10 passengers & crew are killed💔#PlaneCrash #Mexico #XAPRO pic.twitter.com/7w98n6bG5p— Barbarik (@Sunny_000S) December 16, 2025
सॅन माटेओ एटेन्कोच्या महापौर अना मुनिझ यांनी सांगितले की, सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. खाजगी जेट मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को येथून उड्डाण केले आणि राजधानी मेक्सिको सिटीच्या पश्चिमेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या टोलुका विमानतळावर उतरणार होते. मात्र इमर्जन्सी लँडिंगमुळे विमानतळाच्या पाच किलोमीटर आधी फुटबॉल मैदानावर लँडिंग करावे लागले मात्र विमान इमारतीच्या छतावर कोसळले.
इमर्जन्सी लँडिंग (Mexico Plane Crash) दरम्यान विमानाचा तोल गेला आणि तो एका इमारतीवर आदळला असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. हा अपघात औद्योगिक क्षेत्रात झाला आणि इमारतीवर धातूचे छत होते, ज्यावर ते आदळले. विमान आदळताच विमानाने पेट घेतला, परंतु सुदैवाने आत कोणीही नव्हते. जवळच्या रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली, सुमारे 130 लोकांना वाचवले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
तर दुसरीकडे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही आणि तपास सुरू करण्यात आला आहे. खाजगी जेटला आपत्कालीन लँडिंग का करावे लागले याचा तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाड होता की हवामान खराब होते? हा अपघात मानवी चुकीमुळे झाला होता? याचीही चौकशी सुरू आहे.
