Download App

नेहरूंच्या मित्राच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत

PM Narendra Modi Egypt Visit : अमेरिकेचा यशस्वी दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदींचे कैरोच्या विमानतळावर इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी संध्याकाळी कैरो येथे पोहोचले. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी इजिप्तला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी आज कैरोमध्ये इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली यांच्यासोबत गोलमेज बैठक घेणार आहेत. यानंतर ते भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधणार आहेत.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता अल हकीम मशिदीला भेट देतील. यानंतर ते हेलिओपोलिस वॉर सेमेटरीला भेट देतील. त्यानंतर ते इजिप्शियन प्रेसिडेंसीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल सिसी यांची भेट घेणार आहेत. रविवारी पंतप्रधान मोदी एका बैठकीला उपस्थित राहतील ज्यामध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा होईल. या बैठकीत काही करारांवर स्वाक्षऱ्या होणार असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येणार आहे. पीएम मोदींची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार असून दुपारी 3 वाजता ते भारतासाठी रवाना होतील.

भारतीय पंतप्रधानांच्या इजिप्त दौरा
1980 पासून भारतातील पंतप्रधानांनी इजिप्तला चार वेळा भेटी दिल्या आहेत. राजीव गांधी 1985 मध्ये इजिप्तला गेले होते. पीव्ही नरसिंह राव यांनी 1955 मध्ये इजिप्तला, 1997 मध्ये आयके गुजराल आणि 2009 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी समिटसाठी भेट दिली.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची घट्ट मैत्री
50 आणि 60 च्या दशकात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासर यांच्यात घट्ट मैत्री होती. या मैत्रीचा दाखला देत भारतातील इजिप्तचे राजदूत वेल मोहम्मद अवद हमेद म्हणाले, “पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांच्याशी वैयक्तिक संबंध आणि समान अजेंडा शेअर करतील. मला वाटते की दोघांची मैत्री पुढील काळात 1950 आणि 1960 च्या पुढे जाईल.

Tags

follow us