Download App

आज पंतप्रधान मोदी करणार 2022 वर्षातील शेवटची ‘मन की बात’

नवी दिल्ली : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसचं औचित्य साधत देशबांधवांना ‘मन की बात’ कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचं आवाहन केलं होतं. आज होणारा मन की बातचा कार्यक्रम यंदाचा म्हणजे 2022 वर्षातील शेवटचा भाग असणार असणार आहे.

2022 ची शेवटची ‘मन की बात’ या महिन्याच्या 25 तारखेला होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं होतं. या कार्यक्रमाविषयी तुमचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं होतं की, मी तुम्हाला नमो अॅप, MyGov वर लिहा आणि तुमचा मेसेज 1800-11-7800 या क्रमांकावर रेकॉर्ड करा. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ज्या मुद्द्यांवर बोलावं असं तुम्हाला वाटतं, त्या मुद्द्यांसंदर्भात मोदींनी सूचना मागवल्या होत्या. आतापर्यंत मिळालेल्या सूचनांवर पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार आहेत.

मन की बात कार्यक्रम आज 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जाणार आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाईट आणि न्यूजोनियर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाणार आहे. आज या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान देशवासियांशी कोरोनाबाबत सावध राहण्यासाठी बोलू शकतात. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी करु शकतात. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिग पाळण्याचंही आवाहन पंतप्रधान मोदी करु शकतात.

Tags

follow us