Video : भारतातील अल्पसंख्यांकांच काय? पत्रकाराच्या प्रश्नांवर मोदी म्हणाले, भारताच्या डीएनएत..

PM Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौराही चांगलाच गाजत आहे. या दौऱ्यात असे काही प्रसंग घडत आहेत ज्यांची चर्चा देश विदेशात होत आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद […]

Pm Narendra Modi

Pm Narendra Modi

PM Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौराही चांगलाच गाजत आहे. या दौऱ्यात असे काही प्रसंग घडत आहेत ज्यांची चर्चा देश विदेशात होत आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेला प्रश्न आणि त्याला मोदींनी दिलेलं उत्तर याची चर्चा सध्या सुरू आहे.

या पत्रकार परिषदेत मोदींना भारतातील मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर मोदी म्हणाले, भारतात लोकशाही आहे. अध्यक्ष बायडेन म्हणाले त्या प्रमाणे दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे.

आम्ही लोकशाही जगतो. लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित असलेल्या आमच्या संविधानाच्या आधारे आमचं सरकार काम करतं. भारतात जात, पंथ असा कोणताही भेदभाव केला जात नाही. मानवी मूल्ये आणि मानवाधिकार नसेल तर लोकशाहीच टिकणार नाही. भारत सबका साथ, सबका विश्वास और सबका प्रयास यांवर चालतो. भारतात सरकारचे फायदे जे ज्यांना मिळायला पाहिजेत त्यांना मिळतातच. भारताच्या लोकतांत्रिक मूल्यांमध्ये कोणताही भेदभाव नाही. धर्म, जात, वय आणि जमीन या कोणत्याच आधारांवर भेदभाव केला जात नाही, असे मोदी म्हणाले.

15 वेळा उभे राहिले तर, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

अमेरिकेच्या संसदेत भाषण करत असतानाअमेरिकन खासदार किमान 15 वेळा उभे राहिले तर, तब्बल 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढेच नव्हे तर, मोदींचे भाषण संपल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठीदेखील अमेरिकेच्या खासदारांनी उभे राहत टाळ्या वाजवल्या. मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भारताची परखड भूमिका मांडली. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेलं नुकसान आणि दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला.

Video : PM मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा उभे राहिले खासदार, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

Exit mobile version