Download App

मोदी है तो मुमकीन है! PM मोदींसोबत काही मिनिटांच्या भेटीने मस्क झाला मालामाल

  • Written By: Last Updated:

PM Modi Elon Musk Meeting : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत अनेक करार केले जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी विविध क्षेक्षातील व्यक्तींच्यादेखील भेटी घेणार असून, त्यापैकीच एका भेटीची सध्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ही भेट आणि ट्विटरचा मालक आणि पंतप्रधान मोदींची. मस्क आणि मोदींची ही भेट काही मिनिटांचीच होती. परंतु, ही भेट मस्कसाठी लकी ठरली असून, मस्कला थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 82 हजार कोटींचा फायदा झाला आहे.

मोदी आणि मस्क यांच्या भेटीदरम्यान मस्कच्या मालकीची कंपनी टेस्ला कंपनीचे शेअर्सने अक्षरक्षः गगनात भिडले होते. या भेटीदरम्यान टेस्लाच्या भारतातील पुढील भवितव्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मस्कच्या संपत्तीत सुमारे 10 अब्ज डॉलर म्हणजेच
82 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. (Tesla Shares on top during pm modi meeting )

Yoga Day Celebration: भारत-चीन सीमेजवळील सैनिकांचा योगा, पाहा फोटो

टेस्ला शेअर्समध्ये प्रचंड वाढ
मंगळवारी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी मोदींची भेट घेतली. यादरम्यान, टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा झाली असून, याला मस्क यांनी होकार दिला असून, लवकरच भारतात प्लांट उभारण्यात येणार असल्याचे संकेत मस्क यांनी दिले आहेत. या भेटीदरम्यान टेस्लाचे शेअर्स US स्टॉक मार्केट इंडेक्स Nasdaq वर 5.34 टक्क्यांनी वाढून $274.45 वर बंद झाले. तर, कंपनीचा स्टॉक $ 274.75 वर पोहोचला होता. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून 2023 मध्ये 166 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

82 हजार कोटींचा फायदा
दुसरीकडे, टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली असून, मंगळवारी मस्कच्या संपत्तीत ९.९५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मस्कची एकूण संपत्ती आता २४३ अब्ज डॉलरवर पोहोचली असून, मस्कची संपत्ती २०२३ मध्ये १०६ अब्ज डॉलरने वाढली आहे.

‘मी मोदींचा फॅन’

आम्हाला भारतात मोठी गुंतवणूक करण्यासाठी मोदींनी निमंत्रण दिले आहे. आम्हाला भारतातही मोठी गुंतवणूक करायची आहे. भारतासाठी तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा हा त्यांचा हेतू आहे. भारतात विशेषत: सौरऊर्जेमध्ये भरपूर क्षमता आहे. भारताकडे सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी पुरेशी जमीन आहे. मात्र आता त्यातील एक ते दोन टक्केच वापर होत आहे. पंतप्रधानांना खरोखरच भारताची खूप काळजी आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅन आहे. मोदींना भारतासाठी खूप काही करायचं आहे.

Tags

follow us