Download App

Video : PM मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा उभे राहिले खासदार, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

  • Written By: Last Updated:

PM Modi America Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, सध्या सगळीकडे या दौऱ्याची बारकाईने दखल घेतली जात असून, जगभरातील अनेक देश या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. मोदींचा कुठलाही दौरा म्हटलं की, त्याची चर्चा होतेच मग तो दौरा भारतातील असो की, परदेशातील. आता अमेरिकेच्या संसदेत पार पडलेल्या मोदींच्या भाषणासोबतच त्यावेळी घडलेल्या गोष्टींची चर्चा जगभरात केली जात आहे.

15 वेळा उभे राहिले तर, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

अमेरिकेच्या संसदेत भाषण करत असतानाअमेरिकन खासदार किमान 15 वेळा उभे राहिले तर, तब्बल 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढेच नव्हे तर, मोदींचे भाषण संपल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठीदेखील अमेरिकेच्या खासदारांनी उभे राहत टाळ्या वाजवल्या. मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भारताची परखड भूमिका मांडली. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेलं नुकसान आणि दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला.

दहशतवादाला जगासाठी धोका असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकेतील २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, तरीही दहशतवाद आणि कट्टरतावादाचा धोका जगासाठी कायम आहे. अमेरिकेतील लोकशाही जगातील सर्वात जुनी आहे, तर भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, त्यामुळे दोन्ही देशांची ही भागीदारी लोकशाहीच्या भविष्यासाठी खूप चांगली असल्याचे सांगत दहशतवादासाठी पाकिस्तानचे नाव न घेता ताशेरे ओढले.

अमेरिकन खासदारांचे पीएम मोदींसोबत फोटोशूट

भाषणापूर्वी आणि भाषणानंतर अमेरिकन काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी अनेकांना मोदींची ऑटोग्राफ आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत आला नाही.

पीएम मोदींचे भाषण उत्साहवर्धकः अमेरिकन खासदार

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर यूएस काँग्रेसचे सदस्य रो खन्ना म्हणाले की, पीएम मोदींनी अप्रतिम भाषण केले. त्यांनी अमेरिकेच्या आर्थिक, संरक्षण आणि तंत्रज्ञान भागीदारीला दुजोरा दिल्याचे खन्ना म्हणाले. तर, पीएम मोदींच्या भाषणाने आपण खूप प्रभावित झाल्याचे यूएस काँग्रेसचे सदस्य डॅन म्युझर म्हणाले.

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे 

दहशतवाद हा संपूर्ण जगाला धोका : अमेरिकन संसदेत  संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवाद हा जगासाठी मोठा धोका असल्याचे विधान केले. 9/11 आणि 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या हल्ल्यांना एक दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही संपूर्ण जगावर दहशतवाद आणि कट्टरतावादाचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे.

युद्धाचा नव्हे तर मुत्सद्देगिरीचा काळ : यावेळी मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ देत ही वेळ युद्धाची नसून संवाद आणि मुत्सद्देगिरीची असल्याचे सांगितले. रक्तपात आणि लोकांचे नुकसान थांबवण्यासाठी जे काही शक्य आहे ते केले पाहिजे याचा पुनुरूच्चार मोदींनी त्यांच्या भाषणात केला.

भारत-अमेरिका सहकार्याची व्याप्ती अंतहीन : भाषणादरम्यान मोदींनी भारत आणि अमेरिकेतील वाढत्या संबंधांवर भर दिला आणि सांगितले की, दोन्ही देशांमधील सहकार्याची व्याप्ती अंतहीन आहे. दोन्ही देशांमधील समन्वयाची क्षमता अमर्यादित असल्याचा उल्लेखही मोदींनी यावेळी केला.

प्रत्येकाला भारताचा विकास समजून घ्यायचा आहे : लोकशाहीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज प्रत्येकाला भारताचा विकास, लोकशाही आणि विविधता समजून घ्यायची असून, यूएस काँग्रेसला संबोधित करणे हा एक सन्मान आहे आणि हा सन्मान दोनदा मिळणे हे एक भाग्यचं आहे.

https://www.youtube.com/watch?v=LnRjtzoE6aM

Tags

follow us