Download App

स्पेन अन् पोर्तुगालची बत्ती गुल! ट्रॅफिक लाईट्स ते मेट्रो सेवा ठप्प मॅद्रिड ओपन टुर्नामेंटही थांबली

Power outage स्पेन अन् पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये देखील शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली होती. त्याचा मोठा फटका देशातील विविध गोष्टींवर झाल्याचं पाहायला मिळालं.

Power outage in Spain and Portugal Traffic lights, metro services disrupted, Madrid Open tournament also halted : लाईट जाणे किंवा वीज खंडित होणे आपल्या देशामध्ये काही नवीन नाही. मात्र स्पेन अन् पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये देखील शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली होती. त्याचा मोठा फटका देशातील विविध गोष्टींवर झाल्याचं पाहायला मिळालं. या देशांमध्ये वीज नसणे म्हणजे दिवसा देखील समस्या निर्माण करणारं आहे

ग्राहकांनो, 1 मे पासून ATM च्या नियमांमध्ये होणार बदल, द्यावे लागणार जास्त चार्ज; कारण काय?

त्यांच्या पावर ग्रिड ऑपरेटर कंपनी रेड इलेक्ट्रिक आणि या ब्लॅक आउटची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की, ही समस्या देशातील पेनीनसुलर सिस्टीमला प्रभावित करत आहे. त्याचबरोबर शेजारील देश पोर्तुगालला देखील या संकटाचा सामना करावा लागतोय. दरम्यान यामुळे ट्राफिक लाइट्स बंद झाले आहेत. त्यामुळे अपघातांसारख्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अंडरग्राउंड रेल्वे सिस्टीमचे काही भाग रिकामे करावे लागले तसेच ओपन ट्रेन टेनिस टूर्नामेंटमध्ये सुरू असलेला खेळ देखील थांबवण्यात आला यामध्ये ब्रिटिश खेळाडू जेकब फर्नले यांच्यासह अनेक खेळाडूंना कोर्ट सोडावं लागलं.

कॉमनवेल्थ घोटाळ्याचा तपास बंद, कलमाडींविरुद्ध पुरावेच नाहीत, ईडीच्या क्लोजर रिपोर्टला मंजुरी

दरम्यान परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. रेड इलेक्ट्रिकने दिलेल्या माहितीनुसार देशातील उत्तर आणि दक्षिण भागातील अनेक ठिकाणी वीज पुन्हा पूर्ववत स्थितीवर येत आहे. त्यामुळे हे मोठे पाऊल मानले जात आहे.त्यावर पोर्तुगालच्या पोलिसांनी सांगितलं की, देशभरात ट्राफिक लाइट्स बंद आहेत, त्याचबरोबर लिस्बन आणि पोर्टो या ठिकाणी मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे दळणवळणावर देखील याचा मोठा परिणाम झाला. या दोन्ही देशांकडून यावर लवकरात लवकर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.

follow us