Mumbai Rain : पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशन तुंबलं, मेट्रो प्रशासनाची मुजोरी अन् रिपोर्टिंगला मज्जाव

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशन तुंबलं, मेट्रो प्रशासनाची मुजोरी अन् रिपोर्टिंगला मज्जाव

Heavy Rain In Aqua line Metro Mumbai : मुंबईतील (Mumbai Rain) आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाची पहिल्याच मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. स्थानकाच्या आत पुर्णपणे पाणी जमा झाले आहे. वायरिंग, मशीनरी देखील पाण्यात गेल्या आहेत. इन-आऊट एन्ट्री करायच्या मशिनरी सुद्धा पाण्यात आहेत. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली (Heavy Rain) आहे. आजुबाजूचे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. पावसामुळे मेट्रो स्टेशनमध्ये साचलेलं पाणी थेट त्यांच्या घरात जात आहे. मेट्रो प्रशासनाने कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे.

भुयारी मेट्रो स्टेशन पावसाच्या पाण्यामुळे तुंबलं (Maharashtra Weather) असून वायरिंग सगळी पाण्यात आहेत. अनेक ठिकाणी स्टेशनचा स्लॅब देखील कोसळला आहे. मेट्रो तीनचा दुसऱ्या टप्प्यातील सेवा संपूर्णपणे बंद आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. पहिला पाऊस असून सखल भागात पाणी साचतंय. तर यासगळ्या ठिकाणची शुटिंग घेऊ नये म्हणून रिपोर्टिंगला सु्द्धा मज्जाव केला जातोय.

‘व्हाट द हेल’; युक्रेनवर रशियाचा पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया

मेट्रो स्थानकावर अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. तर मेट्रो स्थानकावरील झालेल्या या परिस्थितीचे फोटो घ्यायला, व्हिडिओ काढायला देखील मेट्रो प्रशासनाकडून मज्जाव केला जात आहे. काही ठिकाणी काम पुन्हा एकदा सुरू केलं जात आहे. मात्र या सगळ्याला वेळ लागणार आहे. अख्या भूमिगत मेट्रोमध्ये पाणी साचलं आहे. खरं तर या सगळ्या संदर्भात उपाययोजना करायला हव्या होत्या, परंतु पाणी साचल्यानंतर कार्यवाही केली जात आहे.

प्रेमाच्या गोडसर लहरींनी भरलेलं, ‘सजना’ चित्रपटाचं एक नवीन रोमँटिक गीत “झोका” आपल्या भेटीला

मुंबईत आज पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळायली. मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली होती. मंत्रालय परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते. दादर, माटुंगा, सायन किंगसर्कल परिसरर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील झाला आहे. हवामान विभागाने मुंबईत अलर्ट जारी केला आहे. उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली बांद्रा, गोरेगाव परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. ही घटना सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे. ही भिंत प्रवेश/निकास संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती

यासंदर्भात एमएमआरसी स्पष्ट करु इच्छिते की, पाणी शिरलेला प्रवेश/निर्गम मार्ग सध्या बांधकामाधीन असून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र -आरे जेव्हिएलआर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे.

आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून, बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असून, सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube