Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने झोडपले; १३५ मिमी. पावसाची नोंद, १०७ वर्षांचा विक्रम मोडला

Mumbai receives 135 mm rainfall today, shatters 107-year-old record for month of May : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी (दि.26) सकाळपासून मुंबईला मुसळधार (Mumbai Rain) पावसाला अक्षरक्षः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मुंबईला पुढील काही तास रेड अलर्ट दिला असून, मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १०७ वर्षांपूर्वीचा मे महिन्यातील पावासाचा विक्रमही आज पडलेल्या पावसाने मोडीत काढला आहे.
Video : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, आठवड्याच्या सुरुवातीलाच पळापळ, पुढचे काही तास धोक्याचे
१०७ वर्षांचा विक्रम मोडीत
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, कुलाबा येथील किनारी वेधशाळेत सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३५ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत ३३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात सर्वाधिक २९५ मिमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे मे १९१८ मध्ये नोंदवलेला २७९.४ मिमीचा मागील विक्रम मोडला आहे. सांताक्रूझ स्थानकावर या महिन्यात आतापर्यंत १९७.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस २००० मध्ये ३८७.८ मिमी इतका पडला होता.
बारामतीमध्ये अवकाळी संकट; नीरा डावा कालवा फुटला, लोकांच्या घरात पाणी, अजितदादांकडून पाहणी
साडे अकरा वाजता हाय टाईडचा इशारा
सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. याबाबत BMC कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देण्यात आली आहे. ज्यात मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सकाळी ११:२४ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून, ४.७५ मीटरच्या लाटा उसणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर सायंकाळी ०५:१८ वाजता ओहोटी येणार असून, यादरम्यान समुद्रात १.६३ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय रात्री ११:०९ मिनिटांनी पुन्हा समुद्राला भरती येणार असून याकाळात समुद्रात ४.१७ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे.
🗓️२६ मे २०२५
⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊भरती –
सकाळी ११:२४ वाजता – ४.७५ मीटरओहोटी-
सायंकाळी ०५:१८ वाजता – १.६३ मीटर🌊भरती –
रात्री- ११:०९ वाजता – ४.१७ मीटरओहोटी-
उद्या २७.०५.२०२५ रोजी…— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2025
मुंबईतील विविध भागांमध्ये करण्यात आलेली पावसाची नोंद
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे (नोंद मिलिमीटरमध्ये)
⛈बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
(नोंद मिलिमीटरमध्ये)🔹नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२
🔹ए विभाग कार्यालय २१६
🔹महानगरपालिका मुख्यालय २१४…— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2025
🔹नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२
🔹ए विभाग कार्यालय २१६
🔹महानगरपालिका मुख्यालय २१४
🔹कुलाबा उदंचन केंद्र २०७
🔹नेत्र रूग्णालय, दोन टाकी २०२
🔹सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स) १८०
🔹मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३
🔹ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१
🔹नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३
🔹सुपारी टँक, वांद्रे १०१
🔹जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२
🔹एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६
Commuters please note-
Train Traffic suspended between Wadala -CSMT on Harbour line due to water logging at Masjid station from 10:25 am.#MumbaiRains
pic.twitter.com/KdnbsSLHWf— Mumbai Nowcast (@s_r_khandelwal) May 26, 2025
अनेक ठिकाणी साचले पाणी
पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे चांगले हाल झाले असून, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तर, धुवाँघार पावसाचा फटका अनेक मार्गांवरील लोकल सेवेवरही झाला असून, यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकल एकच ठिकाणी थांबून असल्याने अनेक चाकरमान्यांनी रेल्वे ट्रॅकवरून कामावर जाणे पसंत केले आहे.