Download App

राष्ट्रपतींना दिला राजीनामा, सर्बियात राष्ट्रपतींविरोधात लोक रस्त्यावर

President Aleksandar Vučić resigns amid protests in Serbia, steps down as head of ruling party : सर्बियाच्या राजधानीत सरकार विरोधात लोक गेल्या दिवसांपासून निदर्शने करत आहेत. बेलग्रेडमधील निदर्शने आज चौथ्या आठवड्यानंतरही सुरूच आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, बेलग्रेड आणि आसपासच्या परिसरात दोन सामूहिक गोळीबार झाले होते. त्यामुळं लोकांचा प्रशासनावर रोष उसळला.

सर्बियामधील झालेल्या जीवघेण्या गोळीबारांतर त्यांनी सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकांनी केलेल्या तीव्र निषेधानंतर सर्बियाच्या अध्यक्ष वुकिक यांनी आज सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी (SNS) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी ते म्हणाले की, देशातील घडलेल्या घटना ह्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या असून सरकार या गोळीबाराचं कधीही समर्थन करत नाही. दरम्यान, देशाला एकत्र करण्यासाठी नवीन दृष्टीकोन आवश्यक आहे, असं ते म्हणाले. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतु ते पुढे म्हणाले की ते राज्याचे प्रमुख राहतील.

सर्बियामध्ये दोन मोठ्या गोळीबारीच्या घटना
सर्बिया आणि शेजारच्या कोसोवो, मॉन्टेनेग्रो आणि बोस्नियामधील हजारो लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्याचा निषेध देशात नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे झाला होता. खरे तर याच महिन्यात सर्बियामध्ये 4 मे रोजी रात्री उशिरा गोळीबार झाला होता.

संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रधानमंत्री संसद भवनाला..

सर्बियातील म्लादेनोव्हाक शहरातील दुबोना गावात रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, यापूर्वी 3 मे रोजी सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेत 13 वर्षीय विद्यार्थ्याने गोळीबाराची घटना घडवली होती, ज्यामध्ये 9 लोक ठार आणि 7 जखमी झाले होते. हे सर्बियाचे पहिले शाळेतील सामूहिक शूटिंग होते.

सरकारकडे जनतेच्या मागण्या काय होत्या?

सर्बियातील सामूहिक गोळीबारामुळे सत्ताधारी पक्षाविरोधात संतापाची लाट उसळली. हातात फुले आणि हातात मृत बालकांचे फोटो घेऊन लोक सरकारचा निषेध करत होते. ते सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी (SNS) वर संतप्त होते, कारण त्याचा दावा आहे की सरकार आणि मीडिया आउटलेट्स हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत.

वेळोवेळी हिंसक कंटेटनचा प्रचार करणाऱ्या टेलिव्हिजन नेटवर्कचे प्रसारण परवाने काढून घेण्याची मागणीही आंदोलकांनी सरकारकडे केली. याशिवाय, हिंसाचार भडकावणाऱ्या सरकार समर्थक वृत्तपत्रांवर बंदी घालण्याचे त्यांनी आवाहन केले.

वुकिक 2012 मध्ये पक्षाचे अध्यक्ष झाले
अध्यक्ष वुकिक यांनी विरोधकांवर राजकीय फायद्यासाठी शूटिंग शोकांतिकेचा फायदा घेण्याचा आरोप केला. अल जझीराच्या मते, त्यांनी सत्ताधारी पक्ष SNS च्या प्रमुखपदावरून पायउतार झाले आणि विद्यमान संरक्षण मंत्री मिलोस वुसेविक यांची पक्षाचे प्रमुख म्हणून निवड केली.

सर्बियाचे राष्ट्रपती 2012 मध्ये SNS चे अध्यक्ष झाले. 2017 आणि 2022 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांची उपपंतप्रधान आणि पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा दुसरा आणि अंतिम कार्यकाळ 2027 मध्ये संपणार आहे.

Tags

follow us