संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रधानमंत्री संसद भवनाला..

संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रधानमंत्री संसद भवनाला..

Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. यानंतर आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेल्या पक्षांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. कमी शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. संसद हा लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. सरकारच्या प्रत्येक कृतीचा ते कडाडून विरोध करतात.

संसदेच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी करू नये. राष्ट्रपतींनी करावे असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्यानंतर अनेक विरोधी पक्षांनी हीच भूमिका व्यक्त केली. आणि या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदी सरकारवर टीका केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक भारताची संकल्पना नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जात आहोत की काय अशी काळजी वाटायला लागली आहे.

भारताला विकसित राष्ट्र बनवायचे

संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. या 25 वर्षात आपल्याला भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. लक्ष्य मोठे आणि कठीण आहे. पण प्रत्येक नागरिकाला प्रयत्न करावे लागतील. नवीन संकल्प घ्यावे लागणार आहेत. विकसित भारताच्या निर्माणात संसद भवन प्रेरणा देईल. संसदेत लोकप्रतिनिधी बसतील ते लोकतंत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्र प्रथम या भावनेने पुढे जावे लागेल. व्यवहारावरुन उदाहरण समोर ठेवावे लागेल. स्वतःमध्ये निरंतर सुधारणा कराव्या लागतील. नवीन रस्ते स्वतःच तयार करावे लागतील. लोकहितालाच ध्येय बनवावे लागेल. जबाबदारीचे पालन करावे लागेल, असे मोदी म्हणाले.

New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube