New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स

New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स

New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन (New parliament Building) मोठ्या उत्साहात पार पडले. देशाला आता नवीन संसद भवन मिळाले आहे. मोदी यांच्या हस्ते सभागृहात सेंगोल स्थापित करण्यात आला. संसद भवनाची इमारत बांधताना अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. यात पाच गोष्टी अशा आहेत ज्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत.

तीन अनोखे दरवाजे 

त्रिकोणी आकारातील चार मजली इमारतीचे निर्माण क्षेत्र 64 हजार 500 वर्गमीटर आहे. या इमारतीचे तीन मुख्य द्वारे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार आहे. यामध्ये खासदार आणि अभ्यागत यांच्यासाठी प्रवेशासाठी वेगळे दरवाजे आहेत.

सध्याच्या संसदेच्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 व्यक्ती तसेच सेंट्रल हॉलमध्ये 436 व्यक्ती बसू शकत होत्या. तर येथील लोकसभेत 888 आणि राज्यसभेत 384 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्राने दिले सागाचे लाकूड 

संसद भवनाच्या निर्माणासाठी आवश्यक असणारे साहित्य देशाच्या विविध भागांतून आणण्यात आले. यामध्ये सागवानाचे लाकूड महाराष्ट्रातील नागपूर येथून मागवले होते. लाल आणि पांढऱ्या रंगाचे दगड राजस्थानातील सरमथुरा येथून मागवले आहेत. हिरवा दगज उदयपूर, लाल ग्रेनाइट अजमेर येथून तर संगमरवर दगड अंबाजी येथून मागवले आहेत.

बांधकामात मध्यप्रदेश, राजस्थानचा हातभार 

अशोक चिन्हासाठी सामग्री महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि राजस्थानातील जयपूर येथून मागवली. संसद इमारतीच्या बाहेरील भागासाठी आवश्यक सामग्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून आयात करण्यात आली. दगडावरील नक्षीकाम उदयपूर येथील मूर्तीकारांनी केले. संसदेतील फर्निचर मुंबईमध्ये तयार करण्यात आले.

हरियाणाने दिली वाळू,  उत्तर प्रदेशातून आल्या विटा 

बांधकामासाठी लागणारी वाळू हरियाणातील चरखी दादरी येथे तयार करण्यात आली. एम प्रकारातील वाळू ही एक प्रकारची कृत्रिम वाळू आहे. ही वाळू कठीण दगड तसेच ग्रेनाइटला बारीक तुकड्यात तोडून तयार केली जाते. ही वाळू नदीतील वाळूपेक्षा बरीच वेगळी असते. बांधकामात वापरण्यात आलेल्या विटा हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून मागविल्या होत्या. पितळाच्या कामासाठी आवश्यक साहित्य आणि साचे गुजरातमधील अहमदाबाद येथून मागविल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube