नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) काश्मीरमध्ये पोहोचली आहे. आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील या यात्रेत सहभागी झाले आहे. दरम्यान काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन येत आहे.
आज सकाळी कठुआपासून यात्रेला सुरुवात झाली. चार महिने फक्त टी शर्टवर काढणाऱ्या राहुल गांधींनी कठुआच्या थंडीपासून वाचण्यासाठी जॅकेट घातलेले पाहायला मिळाले. तर ठरल्याप्रमाणे संजय राऊत यांनी गळ्यात भगवी मफलर घालून या यात्रेत सहभागी झाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. गेली 4 महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी यांची यात्रा आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे.
या चारही महिन्यात भारताच्या विविध भागांमध्ये तापमानात चढउतार होते. तरीही राहुल गांधी यांनी पांढरा टी शर्ट हा आपला स्टाईल आयकॉन केला होता. दिल्लीत भारत जोडो यात्रा आली असताना सात डिग्री अंश सेल्सियसमध्येही ते एका टी शर्टवरच दिसले होते.
राहुल गांधीच्या टी शर्टची चर्चा सोशल मीडियावरही बरीच रंगली. सुरुवातील भाजपाने आपल्या सोशल मीडियावर या टीशर्टवरुन राजकारण केले. दरम्यान आज राहुल गांधींनी कठुआच्या थंडीपासून वाचण्यासाठी जॅकेट घातले होते.
यात्रेत राऊत सहभागी
यावेळी खासदार राऊत म्हणाले, गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले. त्या परिवारातून आलेला एक तरुण देशाच्या एकतेसाठी, देशातील द्वेष-सूडभावना नष्ट करण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चार हजार किमी चालत निघाला आहे आणि जनता त्यांना पाठिंबा देत आहे.
यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार आहे. आज २० जानेवारी रोजी ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेली आहे. मी ठरल्याप्रमाणे या यात्रेत सहभागी झालो आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.