‘आंग सान स्यू की’ यांना दिलासा, लष्कराकडून पाच प्रकरणांमध्ये माफी

Aung San Suu Kyi: म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आंग सान स्यू की यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी जंटाने आंग सान स्यू की यांना पाच प्रकरणांमध्ये माफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांना आता 27 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते विन मिंट यांना देखील माफी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते […]

Aung San Suu Kyi

Aung San Suu Kyi

Aung San Suu Kyi: म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आंग सान स्यू की यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी जंटाने आंग सान स्यू की यांना पाच प्रकरणांमध्ये माफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांना आता 27 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते विन मिंट यांना देखील माफी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते फेब्रुवारी 2021 च्या सत्ताबदलापासून तुरुंगात आहेत. जंटाने सू की यांना 19 गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले असून त्यांना एकूण 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारच्या लष्कराने देशाचा ताबा घेतला आणि सू की आणि म्यानमारच्या अनेक बड्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्यू की यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला होता, परंतु लष्कराचे म्हणणे आहे की निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाली होती. मात्र निवडणूक निरीक्षकांना कोणतीही मोठी अनियमितता आढळून आली नाही.

Movies Release In August 2023: ‘रोमान्स अन् अ‍ॅक्शनचा तडका’; ‘या’ महिन्यात चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

लष्कर सत्तेवर आल्यापासून देशात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली शांततापूर्ण निदर्शने जबरदस्तीने रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. यानंतर देशात अनेक हिंसक निदर्शने झाली. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) काही तज्ज्ञांनीही याला गृहयुद्ध म्हटले होते.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरी वनडे; दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’

बेकायदेशीरपणे वॉकी-टॉकी आयात करणे, कोरोनाव्हायरस संसर्ग निर्बंधांचे उल्लंघन करणे, देशद्रोह आणि भ्रष्टाचार या पाच गुन्ह्यांवर सू की यांना 33 तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या पक्षाचे आणि सरकारचे अनेक प्रमुख सदस्यही तुरुंगात आहेत, तर इतर अनेक जण लपून बसले आहेत किंवा परदेशात पळून गेले आहेत.

Exit mobile version