Download App

इम्रान खान यांना दिलासा, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश

  • Written By: Last Updated:

Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तोशाखाना भ्रष्टाचार (Toshakhana Case) प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पुढे ढकलण्याच्या विनंती याचिकेवर निर्णय दिला आहे. न्यायालयाने निकाल देताना इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून, त्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आमिर फारूक आणि न्यायमूर्ती तारिक मेहमूद जहांगिरी यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता, त्यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजता निर्णय सुनावण्यात येईल, असे न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले होते.

इम्रान खान यांच्या वकिलाचा युक्तिवाद
22 ऑगस्ट रोजी झालेल्या अपीलाची सुनावणी काल हायकोर्टात पुन्हा सुरू झाली होती. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाचे (ECP) प्रतिनिधित्व करणारे वकील अमजद परवेझ आजारपणामुळे न्यायालयात हजर राहू शकले नसल्यामुळे शुक्रवारी (25 ऑगस्ट) सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

Asia Cup : अनफिट केएल राहुलची निवड अंगलट; ऐन सामन्यापूर्वी विश्रांती देण्याची नामुष्की

इम्रान खान यांचे वकील लतीफ खोसा यांनी गेल्या गुरुवारी (24 ऑगस्ट) त्यांच्या शिक्षेविरुद्ध युक्तिवाद पूर्ण केला आणि सांगितले की हा निर्णय घाईघाईने देण्यात आला आहे आणि तो त्रुटींनी भरलेला आहे. त्यांनी न्यायालयाला निकाल रद्द करण्याची विनंती केली होती, परंतु बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली होती.

Tags

follow us