Asia Cup : अनफिट केएल राहुलची निवड अंगलट; ऐन सामन्यापूर्वी विश्रांती देण्याची नामुष्की

  • Written By: Published:
Asia Cup : अनफिट केएल राहुलची निवड अंगलट; ऐन सामन्यापूर्वी विश्रांती देण्याची नामुष्की

नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup) थरार उद्यापासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून, स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली. नुकतीच आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यात अनफिट के. एल. राहुलला (KL Rahul) संघात संधी देण्यात आली होती. यावरून आनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर आता ऐन सामन्यापूर्वी अनफिट राहुलला विश्रांती देण्याची नामुष्की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर आली आहे. आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमधून केएल राहुल बाहेर असेल असे राहुल द्रविडकडून सांगण्यात आले आहे. (KL Rahul Unavailable For First Two Games Of Asia Cup)

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रसारमाध्यमांना सांगितले की, केएल राहुलच्या फिटनेसवर काम केले जात आहे. मात्र तो आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. तर, दुसरा सामना 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध खेळवला जाणार आहे. मात्र, या दोन्ही सामन्यांमध्ये केएल राहुल संघाबाहेर राहणार आहे.

अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी

केएल राहुल आयपीएल 2023 दरम्यान जखमी झाला होता. त्यांच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने एनसीएमध्ये फिटनेसवर प्रचंड मेहनेत घेतली होती. परंतु आशिया चषकाच्या निवडीवेळी त्याचे स्नायू पुन्हा दुखावले गेले.  पूर्णपणे फिट नसतानाही केएल. राहुलला संघात स्थान देण्यात आले. तर, संजू सॅमसनचा स्टँड बाय प्लेअर म्हणून संघात समावेश करण्यात आला. राहुल त्याच्या फिटनेस चांगल्याप्रकारे काम करत आहे. मात्र, आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला बाहेर ठेवण्यात आल्याचे राहुल द्रविडने सांगितले.

भारताच्या चंद्र विजयानंतर मुंबई इंडियन्सचं खास ट्विट; ‘वर्ल्डकप’साठी जोडलं 2019 चं कनेक्शन!

भारतीय संघासाठी धक्का

आशिया चषकाच्या सुरूवातीपूर्वीच केएल राहुलला विश्रांती देण्यात आल्याने ही भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जर केएल. राहुल संघात असता तर, त्याच्यामुळे टीम इंडिया अधिक चांगल्याप्रकारे समतोल राखण्यास मदतगार ठरला असता. यष्टिरक्षकाची भूमिका निभावण्याबरोबरच त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली असती. याचा फायदा मोठी धावसंख्या बनवण्यास झाला असता. केएल. राहुलने वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर 53 च्या रनरेटने 742 धावा केल्या असून, यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube