Download App

‘पूप सूटकेस’! पुतिन यांच्या विष्ठेची रहस्यमय सफर, पोर्टेबल टॉयलेट ते ब्रीफकेसपर्यंत झेड प्लस सुरक्षा

Putin Bodyguards Carried Poop Suitcase : जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन (Putin) यांच्याबद्दल एक विचित्र पण तितकीच गुप्तता राखणारी गोष्ट समोर आली आहे. साधारणपणे जगातील कुठलाही नेता परदेश दौर्‍यावर गेला की, त्याचा सुरक्षा ताफा फक्त जीव वाचवण्याची जबाबदारी पार पाडतो. पण पुतिन (Russia) यांच्या सुरक्षारक्षकांना मात्र एक वेगळीच जबाबदारी दिलेली (Putin Poop Suitcase) असते. ती म्हणजे त्यांच्या विष्ठेला सुरक्षित ठेवण्याची. ‘पूप सूटकेस’ नावाच्या खास ब्रीफकेसमध्ये भरून पुतिन यांचा मल परत रशियाला नेला जातो. का बरं असं केलं जातं? त्यांच्या विष्ठेत खरंच किती मोठं गुपित दडलंय? याबद्दल जाणून घेऊ या.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली (Poop Suitcase) आहे. पुतिन कुठेही परदेश दौऱ्यावर गेले, तरी त्यांचा मलविसर्जनाचा कचरा बाहेर सोडला जात नाही. त्यांच्या अंगरक्षकांकडून तो विशेष ब्रीफकेसमध्ये भरून पुन्हा रशियात परत नेला जातो. वैद्यकीयदृष्ट्या मलविसर्जनातून व्यक्तीच्या आरोग्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतात. शरीरातील संसर्ग, गंभीर आजार, औषधोपचारांचा परिणाम (Health) याबाबत माहिती मिळू शकते. त्यामुळे जर मल परदेशात राहिला तर त्या देशाच्या गुप्तचर संस्थांना राष्ट्रपतींच्या प्रकृतीविषयी गुप्त माहिती मिळण्याची शक्यता असते.

Video : हा सामान्य पाऊस नसून हे अतिवृष्टीचे टोक; राज्यभरातील पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

‘पूप सूटकेस’ची सुरक्षा व्यवस्था

फ्रेंच पत्रकार रेगी गेंटे आणि मिखाईल रुबिन यांनी केलेल्या दाव्यानुसार, पुतिन यांच्या फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस (FPS)चे अधिकारी त्यांच्या मलाला खास बॅगमध्ये भरतात. ही बॅग सुरक्षित ब्रीफकेसमध्ये ठेवून थेट रशियाला परत नेली जाते. असे सांगितले जाते की 1999 मध्ये पुतिन सत्तेत आल्यानंतरपासून ही पद्धत राबवली जाते.

 दौऱ्यावरही पोर्टेबल टॉयलेट

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्का येथे भेट घेताना पुतिन यांनी हीच पद्धत अवलंबली होती. त्याचप्रमाणे व्हिएन्ना दौऱ्यावर त्यांनी खास पोर्टेबल टॉयलेटचा वापर केला होता. त्यावेळीही त्यांचा मल रशियाला परत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टेन्शन वाढलं! 33 हजार आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर; ‘डॉक्टर नाहीत, औषधं नाहीत’ रुग्णालयांत गोंधळ

पुतिन यांच्या आरोग्यावर सतत चर्चा

पुतिन यांच्या आरोग्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जगभरात अटकळी सुरू आहेत. कझाकस्तानमधील पत्रकार परिषदेत त्यांचा पाय सतत हलताना दिसल्यामुळे त्यांना पार्किन्सनचा त्रास असल्याची चर्चा रंगली. 2023 मध्ये बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको यांची भेट घेताना त्यांच्या शरीरात झटके दिसल्याचेही वृत्त आले. काही अहवालांनुसार, पुतिन यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या सरकारी निवासस्थानी आपत्कालीन उपचार करावे लागले होते.

पुतिन यांच्या या विचित्र पण काटेकोर सुरक्षा व्यवस्थेमुळे जगभरात चर्चेला उधाण आलंय. विष्ठेसारख्या साध्या गोष्टीवरही इतकं गुप्ततेचं कवच का घालावं लागतं, हा प्रश्न सर्वांनाच पडतोय. पण यामागची खरी भीती म्हणजे — आरोग्याशी निगडित गुपितं उघड होण्याची शक्यता. शेवटी एका राष्ट्रपतीच्या पोटातील हालचालीदेखील आंतरराष्ट्रीय राजकारणात किती महत्त्वाच्या ठरू शकतात, याचं हे जगाला धक्का देणारं उदाहरण आहे.

 

follow us