Russia Ukraine War Donald Trump : रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद थांबण्याची (Russia Ukraine War) कोणतीही चिन्हे नाहीत. रशियन सैन्य मागील आठ तासांपासून युक्रेनवर जोरदार हल्ले (Ukraine Crisis) करत आहे. रशियाच्या अटींवर आम्ही युद्धविराम करणार नाही आणि रशियाला एक (Russia Ukraine Ceasefire) इंचही जमीन देणार नाही अशी घोषणा युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केल्यानंतर रशियाने हल्ले वाढवले आहेत.
विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 15 ऑगस्ट रोजी (Vladimir Putin) अलास्का येथे भेटत आहेत. नेमक्या याच भेटीचं टायमिंग साधून झेलेन्स्की यांनी ही घोषणा केली. रिपोर्ट्सनुसार दोन्ही देशांत युद्धविरामासाठी पुतिन यांच्या अटींवर ट्रम्प सहमत झाले आहेत. परंतु, झेलेन्स्की यासाठी तयार नाहीत. त्यातच झेलेन्स्की यांनी थेट घोषणाच केल्याने ट्रम्प आणि पुतिन दोघांचेही पित्त खवळले आहे.
झेलेन्स्की यांच्या या घोषणेनंतर दोन्ही देशांतील युद्धविरामाची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. इतकंच नाही तर ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीलाही काहीच अर्थ राहिलेला नाही. रशियाच्या अटींवर यु्द्धविराम तर करणार नाहीच पण रशियाला एक इंचही जमीन देणार नाही. झेलेन्स्की यांच्या या घोषणेनं डोनाल्ड ट्रम्प यांंच्या या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे.
धक्कादायक! बस दरीत कोसळून भीषण अपघात; तब्बल 21 लोकांचा मृत्यू, कुठे घडली घटना?
झेलेन्स्की यांच्या या घोषणेनंतर रशिया जाम खवळला आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनवर कब्जा करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. रशियन सैन्य खारकीवपासून कीवपर्यंत, सूमीपासून ओडेसापर्यंत जोरदार हल्ले करत आहे. मिकोलेव आणि ओडेसा शहरांत तुफान बॉम्बफेक सुरू आहे. अशा पद्धतीने पूर्व युक्रेनचा ताबा घेण्याची मोहिमेला वेग दिला आहे. पुतिन यांचे सैन्य युक्रेनला दोन भागात विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्व युक्रेन ताब्यात घेण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. यामुळे आता युक्रेनच्या मोठ्या भूभागावर संकट गडद होऊ लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प आणि पुतिन यांची येत्या 15 ऑगस्टला अलास्कात भेट होणार आहे. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन शांततेसाठी चर्चा करणार होते. दोन्हीही नेते या युद्धविरामासाठी तयार होते. परंतु, झेलेन्स्कींच्या घोषणेनंतर सगळे चित्रच पालटले.
डोनाल्ड ट्रम्प आणि रशिया या युद्धविरामासाठी तयार झाले होते. परंतु, झेलेन्स्की यासाठी तयार नाहीत. कारण युक्रेनचे सैन्य आणि नागरिक दोघांनाही रशियाच्या अटींवर युद्धविराम नको आहे. नुकताच एक सर्वे करण्यात आला होता. यातही युक्रेनमधील 76 टक्के लोकांनी रशियाच्या अटींवर युद्धविराम मंजूर नसल्याचे म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीचं क्रेडिट घेतलंच; ‘या’ दोन देशांतील 37 वर्षांच्या संघर्षाला फुलस्टॉप!