Russia vetoes UN vote : बाह्य अवकाश करारावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला व्हेटो केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर टीका केली आहे. बाह्य अवकाश करारांतर्गत, अण्वस्त्रांसह सामूहिक विनाशाची शस्त्रे (Vladimir Putin) पृथ्वीभोवतीच्या कक्षेत तैनात न करण्याचे कायदेशीर बंधन राज्यांवर आहे. रशियाने न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात या ठरावाला व्हेटो केल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी एका निवेदन प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी रशियावर टीका केली.
Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन
ठरावाला व्हेटो केले
‘आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, रशिया नवीन अण्वस्त्रे विकसित करण्यास सक्षम आहे. “आम्ही राष्ट्राध्यक्ष (व्लादिमीर) पुतिन यांना सार्वजनिकरित्या असं म्हणताना ऐकलं आहे की, रशियाचा अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु, तसं केलं असतं तर रशियाने या ठरावावर व्हेटो केला नसता.” परंतु, ते जस बोलले आहेत तसं वागणार नाहीत. कारण त्यांनी ठरावाला व्हेटो केले आहे. असंही ते म्हणले आहेत.
चीनला दणका! अमेरिका TikTok बंदीच्या तयारीत; भडकलेल्या चीनचाही पलटवार
चीन अलिप्त
सुलिव्हन म्हणाले, ‘आज रशियाने अमेरिका आणि जपानने संयुक्तपणे मांडलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावर व्हेटो केला. हा प्रस्ताव पृथ्वीभोवतीच्या कक्षेत आण्विक शस्त्रे तैनात न करण्याच्या कायदेशीर बंधनाची खात्री देणारा आहे. रशियाने बुधवारी सर्व देशांना अंतराळात धोकादायक अण्वस्त्रे तैनात करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव नाकारला. पंधरा सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 13 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं तर रशियाने विरोध केला तर यामध्ये चीन अलिप्त राहिले आहे.
अंतराळात शस्त्रांवर बंदी
रशियाने हा प्रस्ताव फेटाळून लावताना त्याला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. तसंच, हा प्रस्ताव अंतराळात सर्व प्रकारच्या शस्त्रांवर बंदी घालण्यास सक्षम नसल्याचंही म्हटलं आहे. या ठरावात सर्व देशांना अंतराळात आण्विक शस्त्रे किंवा मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणणारी कोणतीही शस्त्रे तैनात करू नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे. 1967 च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार अंतराळात शस्त्रे ठेवण्यास मनाई आहे.
रशिया अंतराळात अण्वस्त्रे तैनात करणार का?
अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी मतदानानंतर सांगितलं की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणतात की, मॉस्कोचा अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु, रशियाच्या व्हेटोने प्रश्न उपस्थित केला आहे की, सरकार काही लपवत नाही. व्हाईट हाऊसने फेब्रुवारीमध्ये खात्री केली की रशियाने उपग्रहविरोधी शस्त्रे क्षमता प्राप्त केली असली तरी अशी कोणतीही शस्त्रे अद्याप तैनात केलेली नाहीत. पुतिन यांनी नंतर जाहीर केलं की मॉस्कोचा अवकाशात अण्वस्त्रे तैनात करण्याचा कोणताही हेतू नाही. रशियाने अमेरिकेइतकीच अवकाश क्षमता विकसित केली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.