Ukraine Russia War : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच युक्रेनने रशियाला (Ukraine Russia War) जोरदार झटका दिला आहे. युक्रेनमधून युरोपात (Happy New Year 2025) होणारी गॅस निर्यात युक्रेनने रोखली आहे. युक्रेनच्या या निर्णयाने रशियाला (Russia) मोठा धक्का बसला आहे. यामुळे रशियाची आर्थिक कोंडी होणार आहे. तसेच युरोपीय बाजारातील रशियाचा दबदबा कमी होण्याची चिन्हे देखील आहेत. युद्धाच्या आधीच्या कराराची मुदत संपल्यानंतर या कराराची मुदत वाढविण्यास युक्रेनने नकार दिला आहे. हा निर्णय घेत युक्रेनने रशियाचे नाक दाबण्याचे काम केले आहे.
पूर्व सोव्हिएत संघ आणि नंतर रशियाला युरोपीय बाजारात दबदबा निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली होती. आजिमितीस युरोपीय बाजारातील रशियाचा हिस्सा जवळपास 35 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. पण ज्यावेळी रशिया आणि युक्रेन (Ukraine War) यांच्यात युद्ध सुरू झालं त्यानंतर युरोपीय संघाने रशियाकडून (European Union) गॅस खरेदी जवळपास बंद केली. रशियाऐवजी नॉर्वे, कतर आणि अमेरिकेकडून खरेदी सुरू केली. त्यामुळे युरोपीय देशाचं ऊर्जेसाठी रशियावरील अवलंबित्व कमी झालं.
युक्रेनचे ऊर्जा मंत्री हरमन हालूशचेंको यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. युक्रेनने राष्ट्रीय हिताचा विचार करून गॅसचा प्रवाह रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे युक्रेनचेही नुकसान होणार आहे. पारगमन शुल्काच्या 80 कोटी डॉलर्सवर पाणी सोडावे लागणार आहे. तर रशियन कंपनी गॅजप्रोमला तब्बल 5 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत युरोपला लागणाऱ्या एकूण गॅस पैकी आठ टक्के गॅस पुरवठा रशियाकडून होत होता.
गॅस पुरवठा चार पाइपलाइनच्या माध्यमातून केला जात होता. ही पाइपलाईन बाल्टिक समुद्राच्या खाली, बेलारूस आणि पोलंड, युक्रेनच्या माध्यमातून आणि एक काळ्या समुद्राखाली तुर्कीपासून बल्गेरियापर्यंतच्या पाइपलाइनचा समावेश होता. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने बाल्टिक आणि बेलारूस-पोलंड पाइपलाइनच्या माध्यमातून बहुतांश गॅस पुरवठा बंद केला होता.
Russia China : चीन-रशियाकडून डॉलर हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन
दोन वर्षांपूर्वी युद्ध सुरू झालं तरी देखील युरोपने रशियाकडून गॅस खरेदी सुरू ठेवली होती. यावर युरोपीय देशांवर टीका केली जात होती. यानंतर युरोपीय संघाने दोन पावले मागे येत अन्य पर्यायांचा विचार सुरू केला होता. युरोपिय आयोगाने ऊर्जा क्षेत्रात सुधारणा, विस्तार आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लवचिकता आणण्यासाठी निर्णय घेतले.
युरोपीय कमिशने सांगितले की जर रशियाने गॅस पुरवठा बंद केला तरी काही फरक पडणार नाही. रशियाकडील गॅसची कमतरता पूर्ण करण्यासाठी लिक्विफाइड नॅचरल गॅस आणि दुसऱ्या देशांकडून पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस आयात करता येऊ शकतो. कतर आणि अमेरिकेकडून एलएनजी आयात वाढविण्यात आली. तसेच नॉर्वेकडून पाइप्ड गॅस पुरवठा वाढवण्यात आला होता.