Tarrifs On India : आपलं न एेकणाऱ्या देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) धडाधड कर (टॅरिफ) लादतायत. मध्यंतरी भारतावरही अमेरिकेने टॅरिफ (Tarrifs) लागू केलाय. आता अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ अमेरिका हटवू शकतो. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंटमध्ये यांनी तसेच संकेत दिले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ अमेरिकेने भारतावर लादला होता. पण आता भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केलीय. त्यामुळे भारतावरील टॅरिफ अमेरिका मागे घेणार आहे. (Russian oil purchase america roll back 25 tariffs On India)
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट हे दावोस येथील वर्ल्ड इॅकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते. येथे माध्यमांशी संवाद साधताना बेसेंट यांनी टॅरिफ मागे घेण्यावर भाष्य केलंय. भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदीमध्ये मोठी कपात केलीय. टॅरिफ लावल्याचा फायदा अमेरिकेला झालाय. त्यामुळे भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटविला जाऊ शकतो, असे बेसेंट यांनी म्हटलंय.
योगींसोबतच्या वादानंतर 19 वर्षांनी चारही शंकराचार्य एकाच व्यासपीठावर, देशाचं लक्ष वेधलं
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. तर भारताने अमेरिकेतील वस्तूंवरही 25 टक्के टॅरिफ लावलेला आहे. अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ अमेरिकेने भारतावर रशियामधून तेल खरेदी करत असल्यामुळे लावलेला आहे. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून रशियाला पाठिंबा देत असल्याचा आरोप अमेरिकेने लावला होता.
राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार; लवकरच येणार नियम
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर हे भारतात आले होते. त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा केलीय. आता अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी टॅरिफ मागे घेण्याबाबत भाष्य केलंय. परंतु भारताने अद्याप याबाबत कुठलाही प्रतिक्रिया दिलेली नाही.
