Download App

Sajid Mir : 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पाकिस्तान जेलमध्येच दिलं विष…

Sajid Mir News : मुंबईतील घडलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरबाबत(Sajid Mir News) मोठी बातमी समोर आली आहे. साजिद मीरला(Sajid Mir News) पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहातच विष दिल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनूसार साजिद मीर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या साजिद व्हेंटिलिटरवर असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच साजिद मीरला लाहोर सेंट्रल जेलमधून हलवण्यात आले होते. साजिदला पाकिस्तानी लष्कराने विमानाने बहावलपूर इथल्या सीएमएच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नेलं आहे.

कोण आहे साजिद मीर?
साजिद मीर हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) या आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टमाईंड आहे. 40 च्या दशकातील मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. यासोबतच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागामुळे अमेरिकेने त्याच्यावर $5 दशलक्षचे बक्षीसही ठेवलं आहे.

जून 2022 मध्ये, मीरला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगावासाची शिक्षा सुनावली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता, परंतु पाश्चात्य देशांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या मृत्यूचा पुरावा मागितला होता.

पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून 18 लाखांनी घातला गंडा, भोंदू बाबासह चौघांवर गुन्हा दाखल

अमेरिका आणि भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत मीरला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. मीरची मालमत्ता जप्त करण्याची, तसेच त्याच्या हालचालींवर आणि शस्त्रास्त्रे बाळगण्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली होती. 20 जून रोजी चीनने या मुद्द्यावरुन मीरला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मोठा उलटफेर, उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता यांनी मीरच्या दहशतवादी कटाचा ऑडिओ यूएन सभागृहात कथन केला होता. या ऑडिओमध्ये दहशतवादी साजिद मीर म्हणत होता की, ‘कोणताही परदेशी जिवंत सुटू नये, सर्व परदेशींना मारून टाका’, हे ऐकून पलीकडून त्याच्याशी बोलत असलेल्या एका दहशतवाद्यानेही ‘इंशाअल्लाह’ म्हणत आदेशाचे पालन करणार असल्याची पुष्टी केली होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतील आलिशान ताज हॉटेलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांनी 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 166 निष्पाप लोकांचा बळी घेतला. या हल्ल्यात पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीचे अनेक मजले जळून राख झाले होते.

Tags

follow us