Pakistan School Roof Collapsed : पाकिस्तानमधील पेशावरच्या एका भागात शाळेचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 विद्यार्थी आणि एका शिक्षिकेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लेडी रीडिंग हॉस्पिटल’चे प्रवक्ते मुहम्मद आसिम यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, रुग्णालयात इमर्जन्सीची स्थिती जाहीर करण्यात आली असल्याचे सांगितले. 17 विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेत एका शिक्षिकेचाही जीव गेला आहे. मृत मुलांचे वय 13 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी होते. सुमारे 17 जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पेशावरच्या उपायुक्तांच्या (डेप्युटी कमिशनर) कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, छत कोसळले तेव्हा विद्यार्थी त्यांच्या वर्गात होते. ‘रेस्क्यू 1122’चे प्रवक्ते बिलाल अहमद फैझी (Bilal Ahmed Faizi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसह सुमारे 20 जणांना रुग्णालयात हलवले. घटनास्थळावरून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर इतरांचा रुग्णालयात नेताना किंवा तिथे पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर 10 हून अधिक मुलांना रुग्णालयात आणण्यात आले होते.
पाकिस्तानात (Pakistan) छत किंवा इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. जुलै 2026 मध्ये, उमरकोटजवळ एका सरकारी प्राथमिक शाळेची बाहेरील भिंत कोसळल्याने 3 ते 13 वयोगटातील तीन मुली ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याच महिन्यात, लाहोरच्या बागबानपुरा भागात बांधकामाधीन असलेल्या एका खाजगी शाळेचे छत कोसळल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आणि किमान पाच जण जखमी झाले होते.
PAKISTAN: 17 CHILDREN, TEACHER KILLED AS SCHOOL ROOF COLLAPSES IN PESHAWAR
At least 17 students, all under 13, and one teacher were killed when a school roof collapsed in Peshawar, Pakistan.
More than a dozen people were injured, according to a hospital spokesperson.
— Subodh Kumar (@kumarsubodh_) October 15, 2026
तर जून महिन्यात, गुजरात (पाकिस्तान) मधील लालामुसा येथील खवासपूर भागात बांधकामाधीन इमारतीचे छत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्याच महिन्यात लाहोरच्या निश्तार भागात एका घराचे छत कोसळल्याने दोन जण जखमी झाले.
मी अजूनही ‘चोर’ आहे का? मला कधी ना कधी न्याय नक्कीच मिळेल-
ऑगस्ट महिन्यात, इस्लामाबादमधील शहजाद टाऊन येथे सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर एका घराचे छत कोसळले या दुर्घटनेत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुली जखमी झाल्या.
