हिंडेनबर्गचा (Hindenburg Research Report) अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणी कारवाई करत सेबीने गेल्या वर्षभरात अदानी समूहाने केलेल्या गुंतवणुकीची आणि सौद्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सेबी हिंडनबर्गच्या अहवालाचाही अभ्यास करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सेबी आधीच अदानी (Adani) ग्रुपच्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची (FPIs) चौकशी करत आहे. या तपासात सेबी आता हिंडेनबर्गच्या अहवालाचाही समावेश करणार आहे. अदानी समूहाने लिस्टेड केलेल्या केलेल्या सर्व व्यवहारांची सेबी चौकशी करत आहे.
फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गने एक अहवाल तयार केला होता. अहवालात अदानी समूहावर स्टॉकमध्ये फेरफार आणि खात्यातील फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. सोबत टॅक्सचा अयोग्य वापर आणि ग्रुपवरील प्रचंड कर्जाबाबत अहवालात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
अदानी ग्रुपचे म्हणणे आहे की हा अहवाल चुकीच्या हेतूने केलेला आहे. अहवालात करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत अदानी समूहाचे कायदेशीर प्रमुख जतीन जलुंधवाला म्हणाले,
“आम्ही हिंडेनबर्ग अहवालावर कारवाई करण्याची तयारी करत आहोत. यासाठी आम्ही अमेरिकन आणि भारतीय कायद्यांतर्गत कारवाई करू.
Our response to Adani: pic.twitter.com/6NcFKR8gEL
— Hindenburg Research (@HindenburgRes) January 26, 2023
याच पार्शभूमीवर अदानी समूहाकडून कायदेशीर करण्याच्या प्रकरणावर हिंडेनबर्गने सांगितले आहे की ती पूर्णपणे अहवालाच्या समर्थनार्थ आहोत. कोणत्याही कायदेशीर कारवाईचा काहीही फरक पडणार नाही. यावर हिंडेनबर्ग कडून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की
“अदानी समूहाला खरोखरच आमच्यावर कारवाई करायची असेल तर त्यांनी अमेरिकेत कायदेशीर कारवाई करावी. आम्ही फक्त अमेरिकेत काम करतो. कायदेशीर कारवाई करताना अनेक कागदपत्रांचीही मागणी करू.
अहवालाच्या शेवटी 88 प्रश्नांची उत्तरे मागविण्यात आल्याचे हिंडेनबर्गच्या वतीने सांगण्यात आले. हे प्रश्न अदानी समूहाला स्पष्टीकरण देण्याची राहण्याची संधी देतात. मात्र अजूनही अदानी समूहाकडून त्याला उत्तर मिळालेले नाही.