Earthquake In Iran : इराण करतोय अणुबॉम्ब चाचणी? चार दिवसात दुसऱ्यांदा भूकंप  

Earthquake In Iran : अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या सात दिवसांपाासून युद्ध सुरु आहे. यातच पुन्हा एकदा इराणमध्ये जोरदार भूकंप झाला

Earthquake In Iran

Earthquake In Iran

Earthquake In Iran : अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या सात दिवसांपाासून युद्ध सुरु आहे. यातच पुन्हा एकदा इराणमध्ये जोरदार भूकंप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार दिवसांत इराणमध्ये हा दुसरा भूकंप असल्याने इराणने अणुचाचणी केली असल्याची अटकळही सुरु झाली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज इराणमध्ये भूकंपाची (Earthquake In Iran) तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 होती. तर चार दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती.

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका (America) आणि इस्त्रायलने (Israel) इराणवर (Iran) हवाई हल्ला करत युद्धाची सुरुवात केली होती. या हल्ल्यानंतर इराने देखील प्रत्युत्तर देत इस्त्रायलसह अमेरिकेचा समर्थन करणाऱ्या अनेक अरब देशांवर हल्ला केला आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे इस्त्रायल आणि अरब देशात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे युद्ध आणखी काही दिवस चालणार असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी 7 दिवसाआधी शेवटचा प्रयत्न? शरद पवार गटाने प्रस्ताव दिला पण…

गेल्या सात दिवसांपासून सुरु असणाऱ्या या युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील दिसून येत आहे. भारतासह अनेक देशाचा गॅस आणि तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

Exit mobile version