Download App

पाकिस्तानध्ये सत्ता पुन्हा लष्कराच्या ताब्यात जाणार, माजी पीएम अब्बासी यांचा इशारा

  • Written By: Last Updated:

Shahid Khaqan Abbasi Sasi There will be another coup in Pakistan, army will take over the power: श्रीलंकेक जे घडलंय, तेच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडत आहेत. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय उलथापालथ पाहता पाकिस्तानेच माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी (Prime Minister Shahid Khaqan Abbasi) यांनी मोठं विधानं केलं आहे. सध्या देशाची परिस्थिती अशी आहे की, लष्करी सत्तापालट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी लष्कराने खूप कमी वेळा सत्तेत हस्तक्षेप केला. पण, आता देशात संवैधानिक संकट आहे, लोक समस्यांना सामोरे जात आहेत, त्यामुळं परिस्थिती चिघळलेली आहे. परिणामी, देशात लष्कराज येऊ शकते, असं अब्बाासी म्हणाले.

अब्बाासी यांनी सर्व संबंधितांना आपापसात चर्चा करण्याचंही आवानह केलं. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान, पीएमएल-एप सुप्रीमो नवाझ शरीफ आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर या तीन महत्वाच्या व्यक्तींनी पुन्हा चर्चा करावी, असं त्यांनी सांगितलं.

अब्बासी यांनी अराजकतेचा इशारा देत सांगितलं की, जर समाज आणि व्यवस्था यांच्यात संघर्ष होऊन परिस्थिती बिघडली तर अशा परिस्थितीत सत्ता लष्कराच्या हाती जाऊ शकते. ते म्हणाले की, जर समाज आणि संस्थांमधील संघर्ष खूप खोलवर गेला तर अशा परिस्थितीत लष्करही पाऊल उचलू शकते.

“…म्हणून तशी भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका” त्या वक्तव्यावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण

अनेक देशांत असं घडून गेलं की, जेव्हा कधी राजकीय आणि घटनात्मक व्यवस्था लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरते, तेव्हा घटनाबाह्य उपाय केले जातात. यापूर्वी पाकिस्तानची इतकी भीषण आर्थिक आणि राजकीय परिस्थिती कधीच नव्हती. फार दुर्मिळ परिस्थितीत सैन्याने राजकीय सत्ता हस्तगत केली आहे. सध्‍याही अशीच परिस्‍थिती आहे, असा दावा त्‍यांनी केला.

दरम्यान, लष्कर हे मार्शल लॉ लागू करण्याच्या पर्यायावर विचार करत नाही, अशी आशा अब्बासी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मला वाटत नाही की ते यावर विचार करत आहेत, मात्र, जेव्हा त्यांच्याकडे कोणताही ऑप्शन उरणार नाही, अशा परिस्थितीत सैन्य राजकीय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू शकते. आणि जर सैन्यानं सत्ता हातात घेतली तर काही चांगलं करण्याऐवजी परिस्थिती आणखीच बिघडेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, आज 12 महिन्यांपूर्वी इम्रान खान यांची सत्ता जाऊन नवे सरकार सत्तारूढ झाले आहे. पण हे सरकार सगळ्याच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यांनी आजपर्यंत काहीही केले नाही. हे खरोखर देशासमोर एक मोठं संकट आहे, असं ते म्हणाले.

Tags

follow us