Download App

सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासाबाहेर गोळीबार; सुरक्षा रक्षक आणि हल्लेखोर ठार

  • Written By: Last Updated:

US Embassy in Saudi Arabia : सौदी अरेबियातील जेद्दाहमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या (American Embassy) इमारतीजवळ एका सशस्त्रधारी व्यक्तीने सौदी अरेबियाच्या सुरक्षा अधिकार्‍यांवर गोळीबार (firing) केला. या गोळीबारात बंदूकधारी हल्लेखोर आणि एक सुरक्षा रक्षक असे दोघेजण ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी या हल्लेच्या घटनेची माहिती दिली. (Shooting outside US Embassy in Saudi Arabia; Security guards and attackers killed)

हाती आलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला मक्कामध्ये होणाऱ्या भव्य हज यात्रेचे प्रवेशद्वार असलेले शहर जेद्दाहमध्ये झाला. या घटनेत कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला इजा झाली नाही, असे स्टेट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे.

मक्का भागातील पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर व्यक्ती ही कारमध्ये बसून होती. काहीवेळानंतर हा व्यक्ती कारमधून उतराला आणि जेद्दाह गव्हर्नरेटमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या इमारतीजवळ येऊन थांबला. या व्यक्तीच्या हातात बंदुक होती. दरम्यान, याठिकाणी उभा असलेला बंदुकधारी व्यक्ती सुरक्षारक्षकांना खटकला. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस केली. परिणामी, बंदुकधारी व्यक्तीने सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालायला सुरूवात केली. या दोघांच्या झटापटीत सशस्त्रधारी व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात हल्लेखोर आणि सुरक्षारक्षक दोघेही जागीच ठार झाले.

Adipurushवर हायकोर्टाचे ताशेरे; ‘धर्माचे चुकीचे वर्णन करू नये’, म्हणत सेन्सॉर बोर्डाला झापलं  

राज्य वृत्तसंस्था SPA ने याबाबत वृत्त दिले की, वाणिज्य दूतावासाच्या इमारतीजवळ झालेल्या या हल्लात खाजगी सुरक्षा रक्षकाचा एक नेपाळी कर्मचारी गंभीर जखमी झाला आणि नंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावास सौदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, अलिकडच्या वर्षांत वाणिज्य दूतावासाला अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. 2016 मध्ये या दुतावासाच्या इमारतीजवळ झालेल्या स्फोटात एक आत्मघाती बॉम्बर मारला गेला होता. त्यावेळी दोन लोक जखमी झाले होते. तर 2004 मध्ये पाच जणांनी यूएस वाणिज्य दूतावासावर बॉम्ब आणि बंदुकांनी हल्ला केला, ज्यात बाहेरील चार सौदी सुरक्षा कर्मचारी आणि पाच स्थानिक कर्मचारी ठार झाले होते.

Tags

follow us