Download App

अमेरिका ‘बॉम्ब’ वादळानं हतबल, आत्तापर्यंत 48 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका निसर्गाच्या कोपापुढं पुरता झुकल्याचं दिसून आलंय, अमेरिका हतबल झालाय. अमेरिकेतल्या कोट्यवधी नागरिकांचं जगणं बर्फवृष्टीनं कठिण झालंय. घराबाहेर पडता येत नाही, वीज नाही, आरोग्य सुविधा नाहीत आणि तापमान शून्य अशांच्या खाली गेल्यानं संपूर्ण अमेरिका गारठून गेलीय. मिळालेल्या माहितीनुसार 14 लाखांपेक्षा अधिक घरातील वीज गायब झाली आहे. तर तापमान -45 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलं आहे

अमेरिका बर्फवृष्टीनं गोठलीय. अमेरिकतल्या बर्फवृष्टीची दृष्यं थरकाप उडवणारी आहेत. तेथील काही ठिकाणी तापमान विक्रमी उणे 45 अशांच्या खाली देखील गेले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील अनेक शहरं बर्फानं झाकली आहेत. बॉम्ब वादळानं लोकांना घरांमध्येच कैद केल्याचं पाहायला मिळत आहे. घरांच्या भिंतींवर चार फुटांपर्यंत बर्फ साचल्याचं दिसून येतंय. लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणं देखील कठीण होऊन बसलंय. इतकंच काय तर महाकाय समुद्रही बर्फानं गोठून गेलाय.

या वादळामुळं जवळजवळ 14 लाख लोकांच्या घरातली बत्ती गुल झालीय. अमेरिकतल्या अनेक व्यवसायांना या हिमवादळानं ब्रेक लावलाय. सध्या अमेरिकेतल्या 13 राज्यांमध्ये ब्लॅकआऊटचा धोका निर्माण झालाय. ब्लॅकआऊट झाल्यास त्याचा जवळपास साडेतेरा कोटी लोकांना त्रास सहन करावा लागणारय. अमेरिकेत बर्फाच्या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय.

Tags

follow us