Download App

सावधान! ‘डीपसीक’मुळे पर्सनल डेटा धोक्यात; ‘या’ संस्थेने केली धक्कादायक माहिती उघड..

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने डीपसीवर गंभीर आरोप केला आहे. DeepSeek च्या AI चॅटबॉटवर आवश्यकतेपेक्षा जास्त पर्सनल डेटा गोळा होत आहे.

DeepSeek News : मागील काही दिवसांपासून चीनी कंपनी DeepSeek चे एआय मॉडेल चांगलेच चर्चेत आहे. अत्यंत कमी खर्चात तयार झाल्याने यावर आश्चर्य व्यक्त केले जात होते. परंतु, आता याच डीपसीकबाबत धोक्याची घंटा वाजली आहे. या मॉडेलशी संबंधित डेटा स्टोरेज आणि प्रायव्हसीच्या बाबतीत युजर्सच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने डीपसीवर गंभीर आरोप केला आहे. DeepSeek च्या AI चॅटबॉटवर आवश्यकतेपेक्षा जास्त पर्सनल डेटा गोळा करणे आणि याच माहितीचा वापर स्वतःचे प्रशिक्षण करण्याकरता वापर केला जात असल्याचा हा आरोप आहे.

सरकारी यंत्रणांना दिला अलर्ट

दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने स्पष्ट केले आहे की सर्व सरकारी यंत्रणांना डीपसीकबाबतीत आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. डीपसीकवरील चॅट रेकॉर्ड ट्रान्सफर केले जाऊ शकतात. यामध्ये कीबोर्ड इनपुट पॅटर्न कलेक्ट करण्याचे फंक्शन आहे. यामुळे युजर्सची ओळख होऊ शकते. तसेच चीनी कंपन्यांच्या सर्व्हरशी कम्युनिकेट केले जाऊ शकते अशी धक्कादायक माहिती या संस्थेने दिली आहे. यामुळेच दक्षिण कोरिया सरकारच्या अनेक मंत्रालयांनी डीपसीकच्या एआय चॅटबॉटला ब्लॉक केले आहे.

चीनी डीपसीकला दणका! आयर्लंड, इटलीनंतर ‘या’ देशाकडूनही डीपसीकला NO ENTRY

एनआयएसने सांगितले की डीपसीकडून जाहिरातदारांना युजर्सच्या डेटाचा अनलिमिटेड अॅक्सेस दिला जातो. इतकेच नाही तर या युजर्सचा डेटा थेट चीनी सर्व्हरमध्ये स्टोअर केला जातो. चीनच्या कायद्यांनुसार आवश्यकता वाटली तर चीन सरकार हा डेटा एक्सेस करू शकते. यामुळे युजर्सची गोपनियताच धोक्यात येते. सर्व्हिलान्सचे संकटही वाढते. डीपसीकडून संवेदनशील प्रश्नांची उत्तरे विविध भाषांतून वेगवेगळी दिली जात असल्याचा आरोप एनआयएसने डीपसीकवर केला आहे. या चॅटबॉटवरून मिळणारी उत्तरे चीनी प्रॉपेगेंडाने प्रभावित असल्याचेही अनेकांना आढळून आला आहे.

‘या’ देशांतही डीपसीक बंद

ऑस्ट्रेलियाच्या आधी इटलीनेही डीपसीकवर बंदी घातली आहे. तैवाननेही सरकारी विभागांत डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे. युरोप आणि अन्य देशांमध्ये डीपसीकच्य सुरक्षा संबंधींच्या धोक्यांवर बारकाईने तपास केला जात आहे. तसेच येथील काही सरकारे DeepSeek वर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी चीनी सोशल मिडिया अॅप TikTok वर बंदी घातली होती. टीकटॉकही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया सरकारने डीपसीकवर बंदी घालत राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चिनी DeepSeek AI गेमचेंजर ठरणार ? अमेरिकेची मक्तेदारी असलेल्या टेक कंपन्या धोक्यात

follow us