Download App

Southport Stabbing : यूकेमध्ये खळबळ, अनेकांवर चाकूने हल्ला, एकाला अटक

Southport Stabbing : यूकेमधील (UK) साउथपोर्ट (Southport ) शहरात एका व्यक्तीकडून अनेकांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

Southport Stabbing : यूकेमधील (UK) साउथपोर्ट (Southport ) शहरात एका व्यक्तीकडून अनेकांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी (Police) कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, हार्ट स्ट्रीट, साउथपोर्ट येथे सकाळी 11.50 च्या सुमारास चाकू हल्ला झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून एका व्यक्तीला अटक केली. आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर या घटनेत लहान मुलांसह किमान आठ जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर नॉर्थ वेस्ट रुग्णवाहिका सेवेने (North West Ambulance Service) सांगितले की, जखमींना लहान मुलांच्या रुग्णालयासह स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या जखमींवर उपचार सुरु करण्यात आला आहे. याच बरोबर अधिकाऱ्यांनी लोकांना या घटनेच्या आसपासचा परिसरात प्रवेश बंद केला आहे अशी माहिती नॉर्थ वेस्ट रुग्णवाहिका सेवेने दिली.

महायुतीतच पळवापळवी! शिंदेंच्या खास शिलेदाराने हाती बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

या घटनेबाबत एका स्थानिक महिलेने सांगितले की, घरात असताना तिला अचानक पोलिसांच्या सायरनचा आवाज आला आणि त्यानंतर थोड्याच वेळाने व्हॉट्सॲप ग्रुपवर या घटनेची माहिती येऊ लागली. या मेसेजमध्ये लिहिले होते की, तुमच्या खिडक्या लॉक करा आणि युरो डोअर लॉक करा.

Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

follow us

संबंधित बातम्या