Sri Lanka Presidential Election : भारताचा शेजारी देश श्रीलंकेत आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होऊन (Sri Lanka Presidential Election) काल मतदान झाले. देशात आर्थिक संकट कायम असताना (Sri Lanka Crisis) या निवडणुका होत आहेत. आता या निवडणुकीत मोठा उलटफेर होताना दिसत आहे. सध्याच्या राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना मोठा धक्का बसला आहे. कम्युनिस्ट नेते अनुरा कुमारा दिसानायके या निवडणुकीत विजयी झाले आहेत. विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासाठी (Ranil Wickremesinghe) हा मोठा धक्का मानला जात आहे.
श्रीलंकेत आज राष्ट्रपती निवडणूक; दीड कोटी मतदार अन् 39 उमेदवार, कुणाचं पारडं जड..
राष्ट्रपती निवडीसाठी शनिवारी देशातील जनतेने मतदान केलं होतं. मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती. 1 कोटी 70 लाख मतदारांपैकी जवळपास 75 टक्के मतदारांनी मतदान केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक 83 टक्के मतदान झाले होते. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार कम्युनिस्ट नेते अनुरा कुमारा दिसानायके 52 टक्के मतांसह निवडणुकीत विजयी होण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. सध्याचे राष्ट्रपती विक्रमसिंघे थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांना फक्त 16 टक्के मते मिळाली आहेत. साजिथ प्रेमदासा यांना 22 टक्के मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
प्रेमदासा पुन्हा एकदा प्रमुख विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसतील. 2022 मधील आर्थिक संकटानंतर श्रीलंकेतील ही पहिलीच निवडणूक आहे. दिसानायके यांनी नॅशनल पीपुल्स पावर आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या आघाडीत जनता विमुक्ती पेरेमुना पक्षही सहभागी आहे. या पक्षाचा झुकाव मार्क्सवादाकडे आहे. या निवडणुकीत आता या आघाडीचे उमेदवार दिसानायके यांनी जवळपास बाजी मारलीच आहे.
रानिल विक्रमसिंघे यांचे विदेश मंत्री साबरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिसानायके यांचे अभिनंदन केले आहे. दीर्घकाळापासूनच्या आणि थकवा आणणाऱ्या अभियानानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल स्पष्ट आहेत. मी या निवडणुकीत राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. पण देशातील जनतेला त्यांचा निकाल दिला आहे. अनुरा कुमार दिसानायके यांना मिळालेल्या जनादेशाचा आम्ही सन्मान करतो. दिसानायके आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा असे साबरी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर फायनलमध्ये भारताशी कोण भिडणार?
मागील निवडणुकीत दिसानायके यांना फक्त तीन टक्के मते मिळाली होती. श्रीलंकेतील आर्थिक संकट त्यांच्यासाठी मोठी संधी ठरलं. देशातील भ्रष्ट राजकीय संस्कृती बदलण्याचे आश्वासन देत त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांच्यावर लोकांनीही विश्वास दाखवला आहे. श्रीलंकेतील मतदार तीन उमेदवारांना प्राधान्य देत विजेता म्हणून एकाची निवड करतात.