Download App

Sri Lanka Power Cut : श्रीलंकेत बत्ती गुल! संपूर्ण देशात वीजपुरवठा बंद, कारण काय ?

Sri Lanka Power Cut : आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या श्रीलंकेतून मोठी बातमी समोर आली आहे. देशातील जनता (Sri Lanka Power Cut) अंधारात आहे. श्रीलंकेत पुन्हा एकदा गंभीर वीज संकट (Sri Lanka) निर्माण झाले असून अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, की सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देशातील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या येथील  परिस्थिती अत्यंत खराब आहे. आर्थिक संकटाने देश हैराण झाला आहे. अन्य देशांच्या मदतीने तसेच कर्ज घेऊन या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न येथील सरकार करत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सीईबीचे प्रवक्ते नोएल प्रियंथा यांनी सांगितले की या संकटावर मात करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड काम करत आहे. मेन लाइन ब्रेकमुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही समस्या दूर करून शक्य तितक्या लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us

वेब स्टोरीज