International News : अमेरिकेत एका न्यायाधीशाने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. न्यायाधीशांच्या घरातून त्यांना शस्त्रांचा साठा सापडला. न्यायाधीशांच्या घरातून 2600 गोळ्या आणि 47 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायाधीशांनी अद्याप आपला गुन्हा कबूल केलेला नाही.
अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाचे न्यायाधीश जेफ्री फारागुशन यांचा एका रेस्टॉरंटमध्ये पत्नीसोबत वाद झाला होता. त्यानंतर घरी पोहोचल्यावर पुन्हा भांडण सुरू झाले. 72 वर्षीय न्यायाधीशांनी आपल्या पत्नीला बंदूक दाखवत धमकी दिली. त्यावेळी पत्नी म्हणाली की ‘धमकी काय देतोस? हिम्मत असेल तर चालव गोळी.’
Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य
त्यानंतर न्यायाधीशांनी कमरेला बांधलेले पिस्तूल काढले आणि पत्नीवर गोळी झाडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा न्यायाधीश दारूच्या नशेत होते. शवविच्छेदन अहवालात न्यायाधीशांनी पत्नीच्या छातीत गोळी झाडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याने आपल्या एका सहकाऱ्याला मेसेज करून उद्या आपण येणार नसल्याचे सांगितले. उद्या त्याला कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
पत्नीला गोळी मारल्याचे कॉल करून सांगितले
एफबीआयच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीशांचा पत्नी शेरिलसोबत 3 ऑगस्ट रोजी वाद झाला होता. त्याच रात्री त्याने पत्नीची हत्या केली. सध्या लॉस एंजेलिसच्या कोर्टात त्याच्याविरुद्ध खटला सुरू आहे. विशेष म्हणजे गोळीबारानंतर न्यायाधीशांनी 911 वर कॉल करून पत्नीला गोळी मारल्याचे सांगितले.
Welcome 3 Announcement: ‘OMG 2’नंतर खिलाडीच्या आगामी सिनेमाची घोषणा; रिलीजची तारीख आउट
त्यानंतर त्याने कोर्टातील कारकुनाला मेसेज पाठवला की मी माझ्या पत्नीला गोळी मारली आहे. आता मी कोठडीत राहणार आहे. शेवटी त्याने लिहिले, ‘मला माफ करा’. जेफ्री फॅराग्युसन 2015 मध्ये न्यायाधीश बनले. हा अनावधानाने झालेला अपघात असल्याचे त्याच्या वकिलाचे म्हणणे आहे.