Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य

Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य

Sharad Pawar : सध्या देशात भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला जात आहे. इंडिया(India) पक्षातील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही(Sharad Pawar) मोदींवर टीका करणं सोडलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) फेमस डायलॉगचा उच्चार करत शरद पवारांनी मोदींचं भवितव्यच सांगितलं आहे. यांसंदर्भातलं ट्विटच शरद पवारांनी केलं आहे.

आमच्यासोबत येण्यासाठी शरद पवार यांना आम्ही साकडं घातलं; मुश्रीफांचा गौप्यस्फोट

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचाच आदर्श घेतला आहे. 2024 च्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना भेटतीलच. मी पुन्हा येईन असं मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलंय खरं पण, पण फडणवीस त्याच पदावर पुन्हा आले नाहीत, तर ते खालच्या पदावर आलेत., हे मोदींनी लक्षात घ्यावं, असा म्हणत शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray : अजितदादांची नक्कल, 70 हजार कोटींचा घोटाळा अन् भाजपमध्ये टुणकन उडी

काही दिवसांपूर्वीच भाजपला आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. भाजवविरोधात देशातले सर्वच विरोधक एकवटले आहेत. विरोधी पक्षांच्या या एकत्रीकरणाला इंडिया असं नावही देण्यात आलं आहे. तेव्हापासून एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस तर दुसऱीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या तिन्ही घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री सुरु असल्याचं दिसून येत आहे.

बिट्टू बजरंगीला फिल्मी स्टाईल अटक; व्हिडिओवर सोशल मीडियावर व्हायरल

मोदी म्हणतात,’मी पुन्हा येईन’ :
2014 मध्ये मी बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते, देशवासियांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी दिलेले वचन विश्वासात बदलले. 2019 मधील माझ्या कामगिरीच्या जोरावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिले. बदलामुळे मला आणखी एक संधी मिळाली. मी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुन्हा येईन, असं पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती.

PM Modi Speech ; पंतप्रधानांच्या भाषणात कोणता शब्द किती वेळा? भारत- 110, विश्व- 63 आणि परिवारजन- 48 वेळा उल्लेख

एकीकडे शरद पवारांकडून मोदींवर टीका केली जात असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर शरद पवारांना भाजपकडून ऑफर दिली असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यावर पवारांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं ठणकावून सांगूनही विरोधकांनी केलेल्या आरोपांची चर्चा अद्यापही सुरुच आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणावर बोट ठेवत फडणवीसांच्या मार्गदर्शनानेच मोदींनी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांनी याआधी भाजपवर अनेकदा हल्लाबोल केला आहे. मात्र, यावेळी शरद पवारांनी मोदी आणि फडणवीसांचं थेट नाव घेऊनच निशाणा साधल्याने त्यांच्या या विधानावर भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube